शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधून तीनदा गर्भपात, चौथ्यांदा गर्भार; लग्नाचे आमिष दाखवून आरोपी रफुचक्कर

By प्रदीप भाकरे | Updated: November 10, 2022 18:06 IST

खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील घटना

अमरावती : मुंबई व आदिलाबाद येथे ‘लिव्ह इन’मध्ये राहताना तीनदा गर्भधारणा व गर्भपात होऊनही ‘मेल पार्टनर’ने तो मी नव्हेच’चा पवित्रा घेत ‘फिमेल पार्टनर’ला वाऱ्यावर सोडल्याची धक्कादायक बाब येथे उघड झाली आहे. तुर्तास ती पिडिता चौथ्यांदा गर्भवती असून, आरोपी हा ‘नॉट रिचेबल’ झाल्याने अखेर तिने पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी विशाल वसंतराव घोडे (२४, माताखिडकी, कोटेश्वर मंदिरावजवळ, अमरावती) याच्याविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.

तक्रारीनुसार, स्थानिक रहिवाशी असलेल्या २१ वर्षीय तरुणीचे आरोपी विशालसोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहे. ते दोघे दोन वर्षांपूर्वी मुंबईला गेल्यावर ती विशालसोबतच भाड्याने खोली करून राहत होती. यावेळी दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. दरम्यानच्या काळात विशालचे कुटुंबिय त्याला अमरावतीला बोलावित होते. त्यामुळे पीडिता व विशाल अमरावतीला परतले.

महिनाभर अमरावतीत राहिल्यावर पीडिता व विशाल आंध्रपदेशातील अदिलाबादला पळून गेले. तेथे सोबत राहत असताना विशालने लग्नाचे आमिष दाखवून तिचे अनेकदा लैंगिक शोषण केले. त्यातून पीडिताला तिनदा गर्भधारणा झाली. तिनही वेळा तिचा गर्भपात झाला. त्यानंतर यंदाच्या नवरात्रीत पीडित तरुणी व विशाल पुन्हा अमरावतीला परतले. मात्र, त्यानंतर ती व तो विभक्त राहू लागले. दरम्यान, आपण चौथ्यांदा गर्भवती असल्याची चाहूल तिला १ ऑक्टोबर रोजी लागली. तिने ती बाब त्याला सांगितली. त्यानंतर काही दिवस तो तिला भेटायला देखील आला. मात्र, आठवड्याभरापासून त्याने तिला भेटणे टाळले. तुर्तास पिडिता ही तीन महिन्यांची गर्भवती आहे.

आरोपी कुठे आहे, माहित नाही

आरोपीच्या ठावठिकाण्याबाबत आपण त्याच्या कुटुंबियाला विचारले असता, ते आपल्याला माहिती देत नाहीत. मात्र आरोपी विशाल हा अमरावतीमध्ये असल्याची आपली माहिती असून, त्याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून शोषण केल्याची तक्रार पिडिताने नोंदविली आहे. यापुर्वी देखील आपण अनेकदा त्याला लग्नाबाबत विचारणा केली. मात्र, प्रत्येकवेळी त्याने टोलवाटोलव केली. त्याने लग्नाचे आमिष देऊन, पती पत्नीप्रमाणे राहत आपली फसवणूक केल्याचे तिने म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणPregnancyप्रेग्नंसीAmravatiअमरावती