शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

अंघोळीसाठी धबधब्यात उतरणे बेतले 'त्या' तीन युवकांच्या जीवावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 9:45 PM

मध्य प्रदेश हद्दीतील आणि परतवाड्याहून १५ किमी अंतरावरील धारखोरा धबधब्यातील डोहात बुडून अमरावती येथील तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मध्य प्रदेश हद्दीतील आणि परतवाड्याहून १५ किमी अंतरावरील धारखोरा धबधब्यातील डोहात बुडून अमरावती येथील तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. एकमेकांच्या वाचविण्याच्या प्रयत्नात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.  

दीपक विनोद मिश्रा (१८, रा. गोपालनगर, अमरावती), आशिष कोटेचा (१९, रा. नवी वस्ती, बडनेरा) व विनय कुशवाह (रा. मसानगंज, अमरावती) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी या तिघांसह ऋषी मिश्रा, तुषार चौहान, कृष्णा उमरटे हे सहा जण दुचाकीने अमरावती येथून धारखोऱ्याकडे गेले होते. त्यातील एकाचा पाय चिखलात शिरल्याने तो डोहात बुडाला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात अन्य दोघेसुद्धा बुडाले. ते बुडाल्याची माहिती ऋषी मिश्रा, तुषार चौहान, कृष्णा उमरटे यांनी परतवाडा पोलिसांना गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास दिली. यातील दोघांनी थेट दुचाकीने परतवाडा पोलीस ठाणे गाठल्याची माहिती आहे. धारखोरा परिसरात मोबाईल रेंज नसल्याने हा परिसर संपर्कविहीन आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळा आला.

दरम्यान, सायंकाळच्या सुमारास तिघांचेही मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, तर मृतांच्या नातेवाइकांनी परतवाडा पोलीस ठाणे गाठले. सर्व सहाजण एकमेकांचे हात धरून आंघोळीसाठी डोहात उतरले असल्याचा एक घटनाक्रम समोर आला आहे.मध्य प्रदेशातील बानूर ग्रामपंचायत अंतर्गत हा परिसर येत असून, घटनेची माहिती मिळताच परतवाडाचे ठाणेदार सदानंद मानकर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. परतवाडा ते धारणी मार्गावरून बुरडघाटहून जवळपास सात किलोमीटर अंतरावर मध्यप्रदेशच्या भैसदेही तालुक्यात हा प्रसिद्ध धबधबा आहे.

टॅग्स :Deathमृत्यू