शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By प्रदीप भाकरे | Updated: February 14, 2023 17:54 IST

मुलगी तिच्या घरात एकटी असताना आरोपीने तिचा विनयभंग केला

अमरावती : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व १५०० रुपये दंड, न भरल्यास अतिरिक्त एक महिना साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधिश क्रमांक ५ पी. एन. राव यांनी १४ फेब्रुवारी रोजी हा निर्णय दिला.            

विधीसुत्रानुसार, सुनील पंढरीनाथ शेट्टे (वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष, रा. राजुराबाजार, ता. वरूड) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. १४ ऑगस्ट २०१६ रोजी एक अल्पवयीन मुलगी तिच्या घरात एकटी असताना आरोपीने तिचा विनयभंग केला. याबाबत तिने वरूड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.

दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर अतिरिक्त सरकारी वकील मंगेश भागवत यांनी पाच साक्षीदार तपासले. ती साक्ष ग्राहय धरून आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक संगिता गावंडे यांनी केला होता. तर वरूड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र बायस्कर व पोलीस शिपाई अरूण हटवार यांनी पैरवी केली.

टॅग्स :Courtन्यायालयMolestationविनयभंगAmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी