शहर हद्दीतून तीन दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST2021-02-05T05:26:29+5:302021-02-05T05:26:29+5:30
अमरावती : दुचाकी चोरट्यांनी पुन्हा डोकेवर काढले असून, शहरीतील दोन ठाणे हद्दीतून तीन दुचाकी लंपास केल्याची घटना गत दोन ...

शहर हद्दीतून तीन दुचाकी लंपास
अमरावती : दुचाकी चोरट्यांनी पुन्हा डोकेवर काढले असून, शहरीतील दोन ठाणे हद्दीतून तीन दुचाकी लंपास केल्याची घटना गत दोन ते तीन दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी मंगळवारी सिटी कोतवाली व फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
सिटी कोतवाली ठाण्यांतर्गत श्याम चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियासमोरून शंकर नागोसा कपिले (५१, रा. दत्तमंदिरजवळ अंबागेट) यांची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एमएच २७ बीएच ३८१२ ही ३० जानेवारी रोजी चोरीला गेल्याची पहिली घटना घडली. याच हद्दीतील अमित सुरेश राजभर (३१, रा. मधुचंद्र कॉलनी) यांची २५ हजारांची दुचाकी क्रमांक एमएच २७ एव्ही ७२९८ श्याम चौकातील जोशी मार्केटमधून सोमवारी चोरीला गेली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध मंगळवारी गुन्हा नोंदविला. तिसरी घटना इंदला परिसरात घडली. फिरोज खान गुलाम मुस्तफा खान पठाण (५७, रा. इंदला) यांची ३५ हजार रुपये किमतीची एमएच २७ बीएच ९८५६ दुचाकी सोमवारी अज्ञात आरोपीने चोरून नेली. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला. शहरातून दोन दिवसांत तीन दुचाकी चोरीला गेल्याने दुचाकी चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढली की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.