लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात खुल्या जागेवर साठवून ठेवण्यात आलेले तीन ट्रक आडजात लाकूड शनिवारी जप्त करण्यात आले. नव्याने रूजू झालेले उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांनी ही धडक कारवाई केली.भातकुली वनवर्तुळ अंतर्गत लालखडी बिटच्या लोणटेक भागात खुल्या जागेवर अवैध लाकूड साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती उपवनसंरक्षक नरवणे यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनात चांदणी चौक, इमाननगर, लालखडी, सुफीयाननगर नं. २ येथे कारवाई करण्यात आली आहे. दोन ठिकाणच्या धाडसत्रात ७.२५ आणि ११.४३३ घनमीटर लाकूड ताब्यात घेतले. दीड लाखांच्या घरातील एकूण १५१ नग आडजात लाकूड जप्त केले. वनविभागाने याप्रकरणी मोहम्मद हसन मोहम्मद हारूण (रा. चांदनी चौक) याच्याविरुद्ध वनगुन्हा क्रमांक २२/२०१५ व शेख मोहसीन शेख अख्तर (रा. सुफीयाननगर) याच्याविरुद्ध ३८, ३/२०१९ अन्वये वनगुन्हा दाखल केला आहे. वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात जप्त केलेले लाकूड ठेवण्यात आले आहे. टास्क फोर्सचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश धंदर, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर, आरागिरणी वनपाल विनोद ढवळे, जे.डी. साखरकर, नावेद काझी, किशोर धोटे आदींनी कारवाई सहभाग नोंदविला आहे. १० दिवसांतील ही दुसरी कारवाई आहे.वनविभागापुढे पेचखुल्या जागेवर लाकूड ताब्यात घेताना वनगुन्हा कुणाच्या नावे दाखल करावा, हा वनविभागापुढे गंभीर प्रश्न असतो. हीच बाब हेरून लाकूड तस्कर खुल्या जागेवर अवैध लाकूड साठवण्याची क्लृप्ती राजरोसपणे अवलंबित आहेत.
खुल्या जागेवरील तीन ट्रक अवैध लाकूड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:10 IST
शहरात खुल्या जागेवर साठवून ठेवण्यात आलेले तीन ट्रक आडजात लाकूड शनिवारी जप्त करण्यात आले. नव्याने रूजू झालेले उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांनी ही धडक कारवाई केली.
खुल्या जागेवरील तीन ट्रक अवैध लाकूड जप्त
ठळक मुद्देनवीन उपवनसंरक्षक रूजू होताच धडक कारवाई : दोन जणांविरूद्ध वनगुन्हे