म्हशींची वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त
By Admin | Updated: June 22, 2017 00:19 IST2017-06-22T00:19:36+5:302017-06-22T00:19:36+5:30
नागपूर औरंगाबाद महामार्गावरून म्हशीची वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त करण्यात आले. या प्रकरणी ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

म्हशींची वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त
मंगरूळ चव्हाळा पोलिसांची कारवाई : नऊ आरोपी अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळ चव्हाळा : नागपूर औरंगाबाद महामार्गावरून म्हशीची वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त करण्यात आले. या प्रकरणी ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मो. रफिक, मो. शगीर, शरीफ बेग, मुस्ताक अहमद, मुस्ताक कुरेशी, मो.आसिफ, जावेद शेख, संजय शिवलाल राठोड, शेख कादिर यांचा समावेश आहे.
स्थानिक पोलिसांना जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार नाकाबंदी करून ट्रक क्रमांक एमएच ४०-वाय-०१६३, एमएच ४०-३३०४ व एमएच २८-एच-८९४३ यांना थांबविण्यात आले. या ट्रकमध्ये लहान मोठ्या ६२ म्हशी आढळून आल्या. म्हशी व ट्रकसह ४६ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अतिरिक्त पोलीस निरीक्षक आगाशे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज चौधरी, नायब पोलीस हवालदार यावले, बंडू टाके, अविनाश खिराडे, विलास चव्हाण यांनी केली.