मेळघाटात तीन वाघांचे दर्शन

By Admin | Updated: May 25, 2016 00:40 IST2016-05-25T00:40:59+5:302016-05-25T00:40:59+5:30

बुद्ध पौर्णिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना, गुुगामल व अकोट वन्यजीव विभागातील साडेचारशे पाणवठ्यांवर व्याघ्र

Three Tigers View in Melghat | मेळघाटात तीन वाघांचे दर्शन

मेळघाटात तीन वाघांचे दर्शन

व्याघ्र गणना : काहींच्या नशिबी मसन्या ऊद, डुुक्कर, माकड, हरिण
नरेंद्र जावरे परतवाडा
बुद्ध पौर्णिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना, गुुगामल व अकोट वन्यजीव विभागातील साडेचारशे पाणवठ्यांवर व्याघ्र गणनेदरम्यान नागपूरच्या डॉक्टरांना तीन वाघांनी हरणांची शिकार करताना दर्शन दिले. जवळपास तीन तास हा खेळ चालला.
कारंजा येथील एका निसर्गप्रेमींच्या अंगावर अस्वल धावून आले. काहींना राणगवा, मसन्याऊद, माकड, हरिण चौसींगा रानडुक्कर, बिबट, रानकोंबडी, मोर, घुबडाचे दर्शन झाले, यावरच समाधान मानावे लागले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या तीनही विभागांत शनिवारी रात्री दरवर्षीप्रमाणे व्याघ्र व वन्यप्राणी गणनेचे आयोजन करण्यात आले होते. मेळघाटच्या अतिदुर्गम भागातील पाणवठ्यानजिक तयार करण्यात आलेल्या मचानीवर रात्रभर जागून निसर्गप्रेमींना ही वन्यप्राणी गणना करावयाची होती.
पाचशेच्या जवळपास निसर्गप्रेमींनी यात सहभाग घेतला होता. व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने मचानीपर्यंत पोहोचवून देण्यासोबत आवश्यक ती सामग्री दिमतीला वनकर्मचारी, वनमजूर पाणी व इतर साहित्य नोंदवही आणि गणना झाल्यावर सहभाग नोंदविण्याचे प्रमाणसुद्धा देण्यात आले. यंदा मेळघाटात पर्यटकांच्या येण्याच्या संख्येतही कमालीची वाढ होत आहे.

वाघाच्या डरकाळीने
परिसर दणाणला
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राणी प्रगणनेत नागपूर येथील समृद्ध राज व सिद्धार्थ पांडेदेखील आले होते. त्यांना ढाकणा परिक्षेत्रातील सुकळीपुरा मचान भेटली होती. रविवारी पहाटे ४ वाजता त्यांना वाघाच्या डरकाळ्यांना सामोरे जावे लागले. नजीकच्या जंगलात शिकारीचा आवाज व डरकाळ्यांनी अक्षरश: परिसर दणाणला होता. तीन तासापर्यंत वाघाच्या शिकारीची झुंज आणि शिकार झाल्यावर त्यांच्या मांसाचे लचके तोडताना थरार अनुभव नागपूरच्या डॉक्टरांना आल्याची नोंद केल्याचे त्यांनी 'लोकमत'शी बोलतांना सांगितले.

मसन्याउद, मांजर आणि माकड
वन्यप्राणी गणनेत सहभागी निसर्गप्रेमींना मांजर, मसन्याउद, माकड बघण्याचा अनुभवसुद्धा अनेक वन्यप्राणी गणनेत सहभागी निसर्गप्रेमींना आला. त्यांची यामुळे निराशा झाली. राणगवा, माकड, बिबट, मोर, अस्वल, चौसींगा, चितळ, घुबड यासारखे प्राणी दिसल्याची नोंद वन्यप्रेमींनी नोंदवहीत केल्याचे वनसंरक्षक विशाल माळी यांनी सांगितले.

अस्वलाचा थरार
मेळघाटातील वन्यप्राणी गणनेत प्रत्येकाला वाघ दिसावा, अशी अपेक्षा असली तरी ते शक्य नाही. कारंजा येथील मुंधडा हे कोहा येथील मचानवर होते. पहाटे पाच वाजता मचानीजवळ थेट अस्वलाने थयथयाट केल्याने ते अक्षरश: घाबरून गेले. मात्र सहकारी वनमजुराने त्यांना दिलासा दिला.
राज्यातील निसर्गप्रेमींची उपस्थिती
व्याघ्र गणनेत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून निसर्गप्रेमींनी येथे उपस्थिती दर्शविली होती. ४४९ पाणवठ्यांवर ४७१ निसर्गप्रेमींनी हजेरी लावली. यात २० महिलांचाही सहभाग होता.

Web Title: Three Tigers View in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.