तीन हजारांची लाच, दोन पोलिसांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:13 IST2021-04-10T04:13:39+5:302021-04-10T04:13:39+5:30
नांदगाव खंडेश्वर / अमरावती : दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तीन हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ...

तीन हजारांची लाच, दोन पोलिसांना अटक
नांदगाव खंडेश्वर / अमरावती : दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तीन हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहाथ अटक केली. नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यातच ही कारवाई करण्यात आली. महिला पोलीस नाईक सुषमा येवतकर (३२) व पोलीस शिपाई रवींद्र बोंद्रे (३५) अशी लाचखोर आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणातील तक्रारदाराविरुद्ध नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात भादंविचे कलम ३२४ प्रमाणे गुन्हा नोंद असून, सदर गुन्ह्याचा तपास सुषमा येवतकर यांच्याकडे होता. सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक न करण्यासाठी येवतकर व बोंद्रे यांनी ४ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३ हजार रुपये लाच स्वीकारली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.