तीन तोतया पोलीस जेरबंद
By Admin | Updated: December 9, 2015 00:21 IST2015-12-09T00:21:42+5:302015-12-09T00:21:42+5:30
वाहनधारकांकडून वसुली करणाऱ्या तीन तोतया पोलिसांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी आसेगावनजीक मार्गावर पकडले.

तीन तोतया पोलीस जेरबंद
आसेगावजवळील घटना : वाहनधारकांकडून करीत होते वसुली
अमरावती : वाहनधारकांकडून वसुली करणाऱ्या तीन तोतया पोलिसांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी आसेगावनजीक मार्गावर पकडले. सूरज जवजांळ (२४), संतोष सरोदे (४६) व राहुल अनासाने (२५, सर्व राहणार वाकीरायपूर) असे तोतया पोलिसांची नावे आहेत.
आसेगाव ते परतवाडा मार्गावर तोतया पोलीस वाहनधारकांकडून वसुली करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधीर हिर्डेकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय नीलेश सुरळकर, वासुदेव नागलकर, ज्ञानेश्वर, गणेश मांडवकर, महात्मे, दुबे व शेंडे यांच्या पथकाने आसेगावजवळील मार्गावर सापळा रचला. दरम्यान तीन्ही तोतया पोलीस वाहनधारकांना अडवून कागदपत्रांची वसुली करताना आढळून आले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन्ही पोलिसांना रंगेहात अटक करून आसेगाव पोलिसांच्या स्वाधिन केले. हे तोतया पोलीस गेल्या काही दिवसांपासून आसेगाव ते परतवाडा जाणाऱ्या मार्गावरील वाहनधारकांना अडवून वसुली करीत होते. त्यांच्याजवळून एक दुचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. पुढील चौकशी आता आसेगाव पोलीस करीत आहे. (प्रतिनिधी)