शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात तिघांचा डोहात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 09:45 IST

झरणेवाले बाबाच्या दर्ग्यावर दर्शनासाठी गेलेल्या अमरावतीच्या तिघांचा डोहात बुडून करुण अंत झाला. वरुड तालुक्यातील पांढरघाटीपासून मध्य प्रदेश हद्दीतील पाकनदीच्या डोहात रविवारी दुपारी ही घटना घडली.

ठळक मुद्देमुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात पित्यासह मित्राचाही मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती) : झरणेवाले बाबाच्या दर्ग्यावर दर्शनासाठी गेलेल्या अमरावतीच्या तिघांचा डोहात बुडून करुण अंत झाला. वरुड तालुक्यातील पांढरघाटीपासून मध्य प्रदेश हद्दीतील पाकनदीच्या डोहात रविवारी दुपारी ही घटना घडली. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात पित्यासह मित्राचाही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आठनेर पोलिसांना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात यश आले.मो. साकीर अब्दुल कदीर (४० रा. खुर्शीदपुरा, अमरावती), नितीन सुखदेव बोरकर (४२ रा. प्रभात कॉलनी, बडनेरा) आणि साकीब कदीर (५), अशी मृतांची नावे आहेत. मो. साकीर व नितीन बोरकर हे मुलाला घेऊन दुचाकीने रविवारी सकाळी ११ वाजता दर्ग्यावर गेले. पूजाअर्चा करताना मो.साकीर यांचा मुलगा साकीब डोहात पडला. त्याला वाचविण्याकरिता साकीर यांनी उडी घेतली. मात्र, पाण्याचा थांगपत्ता न लागल्याने ते पाण्यात बुडाले. त्यामुळे त्यांचे मित्र नितीन बोरकर यांनीही पाण्यात उडी घेऊन बापलेकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु तिघांनाही जलसमाधी मिळाली.घनदाट जंगलात असलेल्या झरणेवाले बाबा दर्ग्याजवळ ही घटना घडताना तेथे कुणीच नव्हते. परंतु आठनेर वन परिक्षेत्र विभागाचे वनरक्षक सूरज बेठे, वन कर्मचारी डी.एस. चव्हाण, धर्मेद्रसिंग चौधरी, मिश्रा हे जंगलात गस्तीवर असताना त्यांना डोहातील पाण्यावर मुलाचा मृतदेह तरंगताना दिसला. ही माहिती वन कर्मचाऱ्यांनी आठनेर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही मृतदेह बाहेर काढले. मृताच्या खिशात वाहनचालक परवाना आणि आधारकार्ड आणि काठावर एक मोबाईल आढळून आला. यावरून मृतांची ओळख पटली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू