शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दररोज तीन अपघात ३३४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत रस्ता अपघातात ३३४ जणांना प्राणास मुकावे लागले. यामध्ये २६९ पुरुष व ६५ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण २९ अपघातप्रवण स्थळ (ब्लॅक स्पॉट) पोलिसांनी निश्चित केले. राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख जिल्हा महामार्गावर सर्वाधिक अपघाताच्या घटना घडल्याची पोलिसांची आकडेवारी आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात २९ ब्लॅक स्पॉट । वर्षभरात जिल्ह्यात १११६ अपघात

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात वर्षभरात एकूण १११६ रस्ते अपघातांमध्ये ३३४ बळी गेले आहेत. महिन्याकाठी सरासरी ९३ अपघातांमध्ये २७ जणांचा मृत्यू झाल्याचे विदारक वास्तव पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीत समोर आले. जिल्ह्यात अपघातप्रवण असे २९ ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत.१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत रस्ता अपघातात ३३४ जणांना प्राणास मुकावे लागले. यामध्ये २६९ पुरुष व ६५ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण २९ अपघातप्रवण स्थळ (ब्लॅक स्पॉट) पोलिसांनी निश्चित केले. राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख जिल्हा महामार्गावर सर्वाधिक अपघाताच्या घटना घडल्याची पोलिसांची आकडेवारी आहे. वर्षभरात शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण ३४९ अपघातांमध्ये ९२ जणांचा बळी गेला. यामध्ये ८५ पुरुष व सात महिला आहेत. शहरात एकूण २३ ब्लॅक स्पॉट आहेत.ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत सर्वाधिक ७६७ अपघातांमध्ये २४२ जणांना प्राणास मुकावे लागले. यामध्ये १८४ पुरुष व ५८ महिलांचा समावेश आहे. वर्षभरात ११०० पेक्षा जास्त अपघातांची कारणे वेगवेगळी आहेत. यामध्ये वाहतूक नियमांचे पालन न करणे, अजाणत्या वयात वाहन हाताळणे, मद्यपान करून वाहने चालविणे, निर्धारित मर्यादेपेक्षा जादा वेगाने वाहन चालविणे, इतर वाहनांना ओव्हरटेक, वाहन चालविताना मोबाइलवर संभाषण, सीट बेल्ट न लावणे, दुचाकीवर हेल्मेट न घालणे, भरस्त्यात वाहनांची पार्किंग करणे, अपघात टाळण्यारीता पुरेशा उपाययोजना नसणे, रात्री धोकादायक प्रवास आदींचा समावेश आहे.रस्त्यावरील खड्डे जीवघेणेजिल्ह्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे वाहनचालकांच्या हृदयाचे ठोके चुकवितात. हे खड्डे चुकविण्याचा नादात दुचाकीस्वारांचे बहुतांश अपघात होतात. योग्य दिशादर्शक फलक न लावणे, रस्त्याचे बांधकाम करताना कंत्राटदराकडून खरबदारी न घेणे हीदेखील अपघाताची कारणे आहेत. अपघातात कुटुंबप्रमुख दगावल्यानंतर कुटुंबीयांची वाताहत होते. यामुळे प्रशासनाने जशा उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनीही दक्षता घ्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गजानन कोरे यांनी केले.माझ्याकडे वाहतूक विभागाचा चार्ज असताना नोटिफिकेशन काढून शहरात आवश्यक त्या ठिकाणी ट्राफिक सिग्नल लावण्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला होता. शहरात जड वाहनांना फक्त दुपारी २ ते ४ यावेळीतच परवानी दिली जाते. त्याची खबरदारी आम्ही घेतो. नागरिकांनीही वाहतूक नियंमाचे पालन करून पोलिसांना सहकार्य केले पाहिजे.- यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त, अमरावतीअपघाताच्या तीव्रतेवर ठरतात ‘ब्लॅक स्पॉट’जिल्ह्यात २९ अपघातप्रवण स्थळ (ब्लॅक स्पॉट) आहेत. अमरावती शहर पोलीस हद्दीत २३, तर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत सहा ब्लॅक स्पॉट आहेत. तीन वर्षांत ५०० मीटरच्या हद्दीत जर अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असेल, तर त्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्यासंदर्भातील उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.नागरिक जखमीरस्ते अपघातात पोलीस अमरावती शहरात व जिल्ह्यातील ग्रामीण भागात किरकोळ व गंभीर अपघातांमध्ये जखमींची संख्यादेखील मोठी आहे. एकूण ९३६ नागरिक जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. शहरात ९६ गंभीर अपघातांत १५३ जण जखमी आणि १६५ किरकोळ अपघातांत २४१ जण जखमी झाले. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गंभीर व किरकोळ अपघातात ५४२ जण जखमी झाले.लिहून पाठवा तुमची मते !किड्या-मुंग्यांसारखी माणसे दगावतात, तेव्हा त्यामागे कुणाचा तरी दोष असतोच. बरेचदा ‘तांत्रिक’ बाबींवर हा दोष लोटून व्यवस्था हात झटकते. अपघातातानंतर अनेक कळवळणारे प्रश्न उरतातच. कधी विधवा पत्नीच्या रुपात, कधी इवल्या-इवल्या लेकरांच्या वेदनांमध्ये. तर कधी वृद्ध आईबाबांच्या उसाश्यांमध्ये. हे अपघात कसे थांबवता येतील? करुया ‘खुली चर्चा. पत्ता : लोकमत भवन, विभागीय क्रीडा संकुल, शिवाजीनगर, मोर्शी रोड, अमरावती.

टॅग्स :Accidentअपघात