बैठकीला गैरहजर तीन अधिकाऱ्यांना 'शोकॉज'
By Admin | Updated: February 22, 2015 00:08 IST2015-02-22T00:08:42+5:302015-02-22T00:08:42+5:30
जिल्हा शिक्षण समन्वय समिती सभेस गैरहजर असलेल्या आणि उशिरा हजेरी लावलेल्या तिन अधिकाऱ्यांना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बैठकीतच

बैठकीला गैरहजर तीन अधिकाऱ्यांना 'शोकॉज'
अमरावती : जिल्हा शिक्षण समन्वय समिती सभेस गैरहजर असलेल्या आणि उशिरा हजेरी लावलेल्या तिन अधिकाऱ्यांना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बैठकीतच जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांना या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश ेदिले. एवढेच नव्हेतर कारवाईची प्रक्रीया सुध्दा बैठकस्थळीच सोपस्कार पुर्ण करून घेतल्याने अधिकाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्हा शिक्षण समन्वय समितीची सभा शनिवारी पहिल्यांदाच पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात बोलविण्यात आली होती. सकाळी ११.३० वाजता समितीच्या बैढकीसाठी हजर झालेल्या पालकमंत्र्यानी पहिल्यांदाच होत असलेल्या बैठकीला गैरहजर अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत .उपस्थित अधिकाऱ्यांची हजेरी घेऊन बैठकीला गैरहजेर असलेल्या अधिकाऱ्यांना लेखी सुचना देऊनही पालकमंत्र्याच्या आढावा बैढकीचा दांडी मारणाऱ्या तिन अधिकाऱ्यांना शो कॉज देण्यात आल्या आहेत.यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे प्रभारी अधिकारी र्कैलास घोडके, पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्र्वेता बॅनजी या तिन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.या तिनही अधिकाऱ्यांना मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांचे स्वाक्षरीने या शोकॉज बैठकीतच देण्यात आली. बैठकीला गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांन प्रति त्याची आपली तिव्र नाराजी दाखवत अशा पध्दतीने अधिकारी जर काम करत असतील तर काय प्रगती होईल असा सवाल उपस्थित करीत यापुढे अशा प्रकारे अधिकारी कुठलीही सुचना न देता गैरहजर राहिल्यास कारवाई करण्याचे आदेशही सिईओना दिले आहेत.विशेष म्हणजे ज्या तिन अधिकाऱ्यांना शो कॉज नोटीस देण्यात आली त्यांनी तिन दिवसात समाधानकारक खुलासा सादर न करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)