चिखलदरा नगराध्यक्षपदासाठी तीन नामांकन दाखल
By Admin | Updated: June 25, 2015 00:15 IST2015-06-25T00:15:55+5:302015-06-25T00:15:55+5:30
चिखलदरा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बुधवारी तीन उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले.

चिखलदरा नगराध्यक्षपदासाठी तीन नामांकन दाखल
चिखलदरा : चिखलदरा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बुधवारी तीन उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले. त्यामध्ये राष्ट्रवादी तर्फे मावळते नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी तर काँग्रेसतर्फे रुपेश चौबे व राजेश मांगलेकर यांचा समावेश आहे. गुरुवारी नामांकन मागे घेण्याचा दिवस आहे. काँग्रेसतर्फे प्रमुख उमेदवार कोण? याबद्दल संभ्रम आहे.
चिखलदरा नगर पालिका वर्तुळात एकूण १७ सदस्य आहेत. त्यामध्ये ९ राष्ट्रवादी , ६ काँग्रेस तर दोन अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने येथे सत्ता स्थापन केली होती. खुला वर्ग नगराध्यक्ष पदाचे आरक्षण पुन्हा निघाले. (तालुका प्रतिनिधी)
दोन्ही काँग्रेसमध्ये फूट
राज्यात सर्वात लहान ‘क’ वर्ग नगरपालिका असलेल्या चिखलदरा नगरपालीकेची निवडणूक चर्चेत असते. मागील अडीच वर्षात नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी शासनातर्फे आलेल्या विकासात्मक कामे केली. सत्तेच्या खुर्चीत त्याबद्दल किंवा वरिष्ठ पदावर जावू पाहणारे दोन्ही काँग्रेसमधील नगरसेवक हवाबदल करीत आहेत. या काँग्रेसमधून त्या काँग्रेसमध्ये उडी घेतल्याने राष्ट्रवादी व काँग्रेसचे घर फुटले आहे.
संजय खोडके यांची भूमिका ठरेल महत्त्वाची
काँग्रेसचे सरचिटणीस संजय खोडके यांच्या गटातील राष्ट्रवादीचे बहुसंख्य नगरसेवक वजा नगराध्यक्ष मानल्या जातात. संजय खोडके आता काँग्रेसमध्ये गेल्याने ते ठरवतील तोच नगराध्यक्ष होईल हे निश्चित. तर सुरेखाताई ठाकरे यांची सुध्दा सार्वत्रिक निवडणुकीत प्रमुख भूमिका होती. त्या शिवसेनेत गेल्याने त्याचे समर्थन नगरसेवक तळ्यात की मळ्यात सापडले आहे. शेवटी नगराध्यक्ष पदी राजेंद्रसिंह सोमवंशी तर उपाध्यक्षपदी रेशमा परवीन यांची निवड निश्चित मानल्या जाते.