शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

तीन महिन्यांपासून खिचडी उधारीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:06 AM

अमरावती पोषण आहाराचे अनुदान गेल्या एप्रिल महिन्यापासून मिळाले नसल्याने मुख्याध्यापकांना पदरमोड, तर काही ठिकाणी वर्गणी गोळा करीत पोषण आहार विद्यार्थ्यांना पुरविला जात आहे.

ठळक मुद्देनिधीअभावी साहित्य नाही : २ डिसेंबरपासून बंद करणार आहार

आॅनलाईन लोकमतअमरावती पोषण आहाराचे अनुदान गेल्या एप्रिल महिन्यापासून मिळाले नसल्याने मुख्याध्यापकांना पदरमोड, तर काही ठिकाणी वर्गणी गोळा करीत पोषण आहार विद्यार्थ्यांना पुरविला जात आहे. जिल्ह्यात गेल्या शंभर दिवसांपासून साहित्यच मिळाले नाही व त्याकरिता निधीसुद्धा शिक्षण विभागाने उपलब्ध केला नाही. त्यामुळे येत्या २ डिसेंबरपासून जिल्ह्यातील सर्व शाळांत पोषण आहार शिजविणे बंद करण्याचा इशारा जि. प. प्राथमिक शिक्षक समन्वय कृती समितीने दिला आहे.शालेय पोषण आहार योजनेची निविदा निश्चित झाल्याने सप्टेंबर महिन्यात तांदूळ वगळता इतर धान्य व किराणा मुख्याध्यापकांना खरेदी करून योजना चालविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षण विभागाच्या एका मागून एक धडकणाऱ्या परिपत्रकांनी आधीच हैराण झालेल्या शिक्षकांचा शालेय पोषण आहाराचा जाच आणखीच वाढला आहे. पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्रयस्थ यंत्रणेला देण्याची शिक्षकांची मागणी धुडकावून लावत आता धान्याची खरेदी करण्याची जबाबदारी शिक्षक व मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आलेली आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांना शाळेतच पोषण आहार दिला जातो. शिक्षण विभागाकडून ही योजना राबविली जात आहे. सरकारने नियुक्त केलेल्या पुरवठादार एजन्सीकडून शाळास्तरावर धान्याचा पुरवठा केला जातो. पोषण आहार शिजविण्यासाठी शाळेत स्वयंपाकगृहाची व्यवस्था आहे. त्याठिकाणी हा आहार शिजवून मुलांना दिला जातो. गेल्या एप्रिल महिन्यापासून मात्र या योजनेत अडचणी येत आहेत.शाळांना धान्य पुरवठा करण्यासाठी ठेकेदार एजन्सीची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे शाळांना धान्याचा पुरवठा झालेला नाही. गेल्या आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात शाळांना फक्त तांदूळ पुरविण्यात आला. इतर धान्याअभावी योजना बंद पडून मुलांचे हाल होऊ नयेत यासाठी मुख्याध्यापकांनी धान्य व किराणा स्थानिक पातळीवर खरेदी करून योजना सुरू ठेवण्याचे आदेश संचालकांनी दिले आहेत. त्यानुसार शिक्षक धान्य व किराणा मालाची खरेदी करून योजना चालवित आहे. बºयाचदा उधारीवरही धान्य खरेदी करावी लागत आहे.वारंवार शिक्षक संघटना व मुख्याध्यापक जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शालेय पोषण आहार अधीक्षक तसेच शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना याबाबतची तक्रार करूनसुद्धा आॅनलाईनच्या नावाखाली व एजन्सीला धान्य पुरवठ्याची एजन्सी न दिल्यामुळे जिल्ह्यातील शाळांना धान्य व इतर साहित्याचा पुरवठा झालेला नाही.मुख्याध्यापक, शिक्षकांवर आर्थिक ताणशालेय पोषण आहार योजना स्वतंत्रपणे चालविण्याची मागणी बºयाच दिवसांपासून शिक्षकांकडून व संघटनांकडून केली जात आहे. योजना राबविणाऱ्या अधिकाºयांनी पोषण आहाराचे नमुने ‘एफडीए’कडे पाठविण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात मात्र या आदेशानुसार कार्यवाही झालेली नाही. स्वयंपाक्यास मानधन न मिळाल्यामुळे व भाजीपाला इंधन खर्च शाळेला मिळाला नसल्यामुळे स्वत:जवळचे पैसे द्यावे लागत असल्याने मुख्याध्यापक व शिक्षकांवर अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे.