शिवीगाळप्रकरणी तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:11 IST2021-04-12T04:11:25+5:302021-04-12T04:11:25+5:30
फिर्यादी भारतभूषण मधुकरराव वडाशे (३५, रा. आश्रमशाळा, नेरपिंगळाई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आश्रमशाळेच्या परिसरात विद्यार्थी शिक्षक, कर्मचारी स्वच्छता करीत असताना ...

शिवीगाळप्रकरणी तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा
फिर्यादी भारतभूषण मधुकरराव वडाशे (३५, रा. आश्रमशाळा, नेरपिंगळाई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आश्रमशाळेच्या परिसरात विद्यार्थी शिक्षक, कर्मचारी स्वच्छता करीत असताना उपस्थितांचे मोबाईलवर छायाचित्र घेत असताना आरोपीस हटकले असता, आरोपीने अश्लील शिवीगाळ केली. यावरून शिरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासी अंमलदार विनोद धर्माळे यांनी मोर्शी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश जे.जे. वाघ यांनी साक्षी-पुरावे तपासून आरोपीला भादंविचे कलम २९४ अन्वये दोषी मानून तीन महिने सक्तमजुरी कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी कारावास अशी शिक्षा ठोठावली. सरकारी वकील म्हणून यू.आर. बारब्दे हे असून, तपासी अंमलदार विनोद धर्माळे हे होते. कोर्ट पैरवीचे काम हेडकॉन्स्टेबल संतोष बावणे यांनी पाहिले.