तीन नगराध्यक्ष अविरोध

By Admin | Updated: July 19, 2014 23:40 IST2014-07-19T23:40:17+5:302014-07-19T23:40:17+5:30

जिल्ह्यातील सात पालिकांमध्ये येत्या २२ जुलै रोेजी नगराध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. शनिवारी नामांकन परत घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी अचलपूर, चांदूूरबाजार आणि

Three mayor unrestricted | तीन नगराध्यक्ष अविरोध

तीन नगराध्यक्ष अविरोध

अमरावती : जिल्ह्यातील सात पालिकांमध्ये येत्या २२ जुलै रोेजी नगराध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. शनिवारी नामांकन परत घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी अचलपूर, चांदूूरबाजार आणि धामणगाव रेल्वे तालुुक्यांत नगराध्यक्षांची अविरोध निवड करण्यात आली. एकूणच राजकीय घडामोडी आणि ऐनवेळी विरोधकांनी घेतलेली माघार यामुळे या तीनही पालिकांमध्ये नगराध्यक्षांची अविरोध निवड झाली. २२ जुलै रोजी या नगराध्यक्षांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात येईल. शेंदुरजनाघाट, अंजनगाव सुर्जी आणि चांदूररेल्वे या ठिकाणी २२ जुलै रोजी निर्धारित कार्यक्रमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पार पडेल..
अचलपूर नगराध्यक्षपदी नंदवंशी
नगराध्यक्षपदासाठी नामांकन परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांपैकी तिघांनी नामांकन परत घेतल्यामुळे अचलपूरच्या नगराध्यक्षपदी नगर सुधार आघाडीचे अपक्ष उमेदवार रंगलाल नंदवंशी यांची अविरोध निवड करण्यात आली.
अचलपूर नगरपरिषदेमध्ये एकूण ३८ नगरसेवक असून नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित होते. शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत नगराध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल करायचे होते. या वेळेपर्यंत विद्यमान नगराध्यक्ष अरुण वानखडे, रंगलाल नंदवंशी, गोपाल लुल्ला व भारती तट्टे यांनी अर्ज दाखल केले. शनिवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत रंगलाल नंदवंशी वगळता तिघांनी नामांकन परत घेतले. परिणामी रंगलाल नंदवंशी यांची एकमताने अविरोध निवड करण्यात आली.
अचलपूर नगरपरिषदेमध्ये नगर सुधार आघाडीचे १२, काँग्रेस ४, राकाँ २, प्रहार ८, मुस्लिम आघाडी ७, अपक्ष २ असे एकूण ३८ नगरसेवक आहेत. रंगलाल नंदवंशी हे अचलपूर नगरपरिषदेचे ११ वे नगराध्यक्ष झाले आहेत.
राजकीय आखाडा जिंकला
रंगलाल नंदवंशी यांचे वडील सुध्दा नगरसेवक होते. ते कुस्तीमध्ये प्राविण्यप्राप्त असून दिल्ली येथील पहेलवान हनुमान यांचे शिष्य होते. आॅलम्पिक कुस्तीमध्ये जापान व देशभरातील कुस्तीचे मैदान नगराध्यक्ष रंगलाल पहेलवान यांनी गाजवले आहे. नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राजकीय आखाडासुद्धा जिंकल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. यापूर्वी ते प्रभाग क्रमांक तीन मधून नगरसुधार आघाडीकडून निवडून आले होते.

Web Title: Three mayor unrestricted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.