मास्क घेण्यासाठी उतरलेल्या ग्राहकाच्या डिक्कीतून उडवले तीन लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:11 IST2021-07-01T04:11:28+5:302021-07-01T04:11:28+5:30
धामणगाव रेल्वे : बँकेतून तीन लाख रुपये काढल्यानंतर मास्क खरेदीसाठी दुचाकीवरून उतरलेल्या व्यक्तीच्या डिक्कीतून ती रक्कम बेपत्ता झाली. ही ...

मास्क घेण्यासाठी उतरलेल्या ग्राहकाच्या डिक्कीतून उडवले तीन लाख रुपये
धामणगाव रेल्वे : बँकेतून तीन लाख रुपये काढल्यानंतर मास्क खरेदीसाठी दुचाकीवरून उतरलेल्या व्यक्तीच्या डिक्कीतून ती रक्कम बेपत्ता झाली. ही घटना शहरातील मेन लाईनमध्ये एका मेडिकलसमोर बुधवारी दुपारी १२ वाजता घडली.
शहरातील मोहम्मदपुरा येथील रहिवासी दौलत घाटे यांनी बँक ऑफ इंडियामधून दुपारी १२ वाजता तीन लाख रुपये काढले. त्यानंतर मास्क घरी विसरल्यामुळे मेन लाईनमधील राठी मेडिकलपुढे दुचाकी उभी करून मास्क घेण्यासाठी ते गेले. चावी खिशात असतानाही या गाडीच्या डिक्कीतून तीन लाख रुपये बेपत्ता झाले. ही बाब त्यांना घरी गेल्यानंतर लक्षात आली. दत्तापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. घटनेचा तपास ठाणेदार ब्रह्मानंद शेळके यांच्या मार्गदर्शनात शिवानंद खेडकर करीत आहेत. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले. मात्र, त्यांची रेंज घटनास्थळापर्यंत नव्हती, अशी माहिती आहे.