मुंबईत काम करणाऱ्या ३४ मजुरांना तिवस्यात पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:39+5:30
राज्यात मुबंईत सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुबंईतुन अनेक जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून खासगी वाहनाने हे ३४ मजूर आपल्या गावी झारखंड राज्यात जात असताना मोझरी येथे तिवसा पोलिसांना ते वाहन दिसले. त्यामुळे पोलीस व महसूल विभागाने त्यांना तिवसा येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात ठेवले. त्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यांना जिल्ह्याबाहेर न जाऊ देता तिवसा येथेच ठेवणार असल्याची माहिती आहे.

मुंबईत काम करणाऱ्या ३४ मजुरांना तिवस्यात पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : मजुरासह वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. राज्यासह जिल्हाच्या सीमा सील केल्या आहेत. मात्र, प्रशासन व पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून मुंबईत बांधकामावर काम करणाºया ३४ मजुरांना झारखंडमध्ये अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना मोझरी येथे सोमवारी सकाळी ११ वाजता सर्वांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. मजूर इतके अंतर कसे पार करून आले, याचा शोध आता चालू आहे.
राज्यात मुबंईत सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुबंईतुन अनेक जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून खासगी वाहनाने हे ३४ मजूर आपल्या गावी झारखंड राज्यात जात असताना मोझरी येथे तिवसा पोलिसांना ते वाहन दिसले. त्यामुळे पोलीस व महसूल विभागाने त्यांना तिवसा येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात ठेवले. त्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यांना जिल्ह्याबाहेर न जाऊ देता तिवसा येथेच ठेवणार असल्याची माहिती आहे. यावेळी तहसीलदार वैभव फरतारे, पोलीस निरीक्षक गोपाल उबंरकर, नगरपंचायत मुख्याधिकारी पल्लवी सोटे, नायब तहसीलदार दत्ता पंधरे, मंडळ अधिकारी दिलीप इंगळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
मुबंई येथून पोलिसांच्या नजर चुकीने लांब अंतर कापून आलेल्या मजुरांची तपासणी करून आता निगराणी खाली ठेवण्यात आले आहे.