दोघांकडून तीन देशी कट्टे, आठ काडतूस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:12 IST2021-03-24T04:12:40+5:302021-03-24T04:12:40+5:30
गुन्हे शाखेची कारवाई, सै. वसीम याच्याकडून पुढे आली माहिती अमरावती : नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत दोघांकडून तीन देशी कट्टे ...

दोघांकडून तीन देशी कट्टे, आठ काडतूस जप्त
गुन्हे शाखेची कारवाई, सै. वसीम याच्याकडून पुढे आली माहिती
अमरावती : नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत दोघांकडून तीन देशी कट्टे व आठ जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले. २२ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. १ लाख १३ हजारांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला.
पोलीस सूत्रांनुसार, शेख समीर शेख अफसर (२६), मोहम्मद अवेस मोहम्मद लतीफ (२१, दोघेही रा. गौसनगर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध कलम ३/२५, ७/२५ आर्म ॲक्ट सहकलम १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख समीर याच्याकडून दोन देशी कट्टे व तीन काडतूस आणि मोहम्मद अवेस याच्याकडून एक देशी कट्टा व पाच काडतूस पोलिसांनी जप्त केले. १ लाख ५ हजारांचे देशी बनावटी तीन कट्टे व आठ हजारांची आठ काडतूस असा हा मुद्देमाल त्यांनी अवैध शस्त्रविक्री करणारा सै. वसीम याच्याकडून विकत घेतला होता. सै. वसीम या आठवड्यापूर्वी पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीत शेख समीर व मोहम्मद अवेस यांची नावे पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्यांनाही गजाआड केले.
पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे कैलास पुंडकर यांंच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकिरण येवले, हेडकॉन्स्टेबल राजेश राठोड, नायक पोलीस कॉन्स्टेबल गजानन ढेवले, नीलेश जुनघरे, दीपक दुबे, सैयद इमरान, कॉन्स्टेबल चेतन कराडे यांनी ही कारवाई केली.