तिवस्यात एकाच रात्री तीन घरे फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:37 IST2018-06-11T22:37:02+5:302018-06-11T22:37:02+5:30
येथील कमल कॉलनीतील तीन घरे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री फोडून घरातून १५ हजारांची रोकड लंपास केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

तिवस्यात एकाच रात्री तीन घरे फोडली
ठळक मुद्देभीती : १५ हजारांची रोकड लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : येथील कमल कॉलनीतील तीन घरे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री फोडून घरातून १५ हजारांची रोकड लंपास केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
वरुड पो.स्टे.ला कार्यरत असलेले उमेश ढेवले, पालवाडी जि.प.शाळेचे शिक्षक विनोद औरंगपुरे व चंद्रशेखर देशमुख यांच्या घरातून ऐवज लंपास केला. रविवारी तिघेही घरमालक बाहेरगावी गेले होते. हीच संधी साधत चोरट्यांनी हात साफ केला. घरात सर्व सामान अस्ताव्यस्त पडून होते. तिघांनीही तिवसा पोलिसात तक्रार दिली असून, पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पीआय सतीश जाधव करत आहे.