राजुऱ्यातील तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:12 IST2021-04-10T04:12:15+5:302021-04-10T04:12:15+5:30
पान २ ची बॉटम रोखही जळली, शेतीपयोगी साहित्य जळाल्याने शेतकरी हवालदिल राजुरा बाजार : येथील रामनगर परिसरात जिल्हा ...

राजुऱ्यातील तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी
पान २ ची बॉटम
रोखही जळली, शेतीपयोगी साहित्य जळाल्याने शेतकरी हवालदिल
राजुरा बाजार : येथील रामनगर परिसरात जिल्हा परिषद शाळेमागे असलेल्या तीन घरांना भीषण आग लागली. यात शेतीपयोगी साहित्य, तूर व रोख ४० हजार जळून खाक झाले. गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास हा अग्नीप्रकोप झाला.
रामनगर भागातील रहिवासी प्रमिला साबळे यांच्या घराला अचानक आगीने कवेत घेतले. काही कळायच्या आतच साबळे यांच्या घरासह बाजूच्या विठ्ठल काकडे व प्रल्हाद नरसिंगकर यांचे गोठे आगीत पूर्णत: खाक झाले. साबळे यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, धान्य, शेतीपयोगी अवजारे, पाईप, कुटार, सोन्याचे दागिने व रोख जळून खाक झाली. ग्रामस्थांनी बादल्यांनी, पाईपने पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचा भडका उडाल्याने एकच हलकल्लोळ माजला.
परिसथितीचे गांभीर्य ओळखून वरूड तथा शेंदूरजनाघाट पालिकेच्या अग्निशमन यंत्रणेची मदत मागविण्यात आली. तेथील दोन बंब घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली. तोपर्यंत संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते. घटनास्थळी ठाणेदार चौगावकर व तहसीलदार किशोर गावंडे यांना पंचनामा करण्याचे निर्देश दिले. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गोठ्यात बांधलेली जनावरे बाहेर काढल्याने जीवित हानी टळली. एक बकरी गंभीररीत्या होरपळली. यावेळी समाजसेवी संस्थांनी तातडीची मदत म्हणून साबळे कुटुंबीयाला तात्पुरता निवारा व रोख रक्कम दिली. या वेळी आमदार देवेंद्र भुयार, जि.प.सदस्य राजेंद्र बहुरुपी, तहसीलदार किशोर गावंडे, मंडळ अधिकारी नंदकुमार गुल्हाने, सरपंच नीलेश धुर्वे, उपसरपंच प्रशांत बहुरूपी, राहुल श्रीराव आदी घटनास्थळी उपस्थित होते.
यात पथ्रोटच्या आगीची बातमी घेणे