तीन फुटाच्या रोपट्याने चार वर्षांमध्ये गाठली ३५ फूट उंची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:13 IST2021-09-19T04:13:17+5:302021-09-19T04:13:17+5:30
नव्या विक्रमाची नोंद, ऑक्सिजन पार्कमधील घटना अनिल कडू परतवाडा : अमरावती येथील ऑक्सिजन पार्कमध्ये चार वर्षांपूर्वी लावलेल्या तीन फूट ...

तीन फुटाच्या रोपट्याने चार वर्षांमध्ये गाठली ३५ फूट उंची
नव्या विक्रमाची नोंद, ऑक्सिजन पार्कमधील घटना
अनिल कडू
परतवाडा : अमरावती येथील ऑक्सिजन पार्कमध्ये चार वर्षांपूर्वी लावलेल्या तीन फूट उंचीचे वडाचे रोपटे अवघ्या चार वर्षात ३५ फूट उंच वाढले आहे. हा राज्यातीलच नव्हे, तर देशातील विक्रम ठरला आहे.
तत्कालीन अर्थ नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी १७ जुलै २०१७ ला फक्त तीन फूट उंच असलेल्या वडाच्या रोपांचे वृक्षारोपण केले. यादरम्यान केवळ चार वर्षात या झाडांचे, वनपाल विलासराव देशमुख यांनी मोजमाप घेतले असता, झाडांची उंची तब्बल ३५ फूट, तर खोडाची गोलाई १०५ सेंमी झाली आहे. ऑक्सिजन पार्कमध्ये चार वर्षात झालेली ही वाढ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक विक्रम ठरला आहे. यात वनपाल राजेश घागरे, वनमजूर सुधाकर कदम आणि वनपाल विलासराव देशमुख, वनक्षेत्रपाल भुंबर यांचे परिश्रम उल्लेखनीय ठरले.