लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक गांधीपूल भागातील विणकर वसाहतीत चिनी मांज्यामध्ये अडकलेल्या एका तीन फुटांच्या घुबड पक्ष्याला जीवदान देण्यात आले. दोरांमधून मोकळे केल्यानंतर त्या मादी घुबडाला वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.२० जून रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास गांधीपूल येथील विणकर वसाहतीतील गृहस्थ रमेश नाडगे यांना मांज्याच्या धाग्यात गुरफटलेल्या अवस्थेत पक्षी दिसून आला. त्यांनी तत्काळ झाडावर चढून त्याला खाली आणले. तो घुबड असल्याचे निरिक्षण अनेकांनी नोंदविले. परिसरात संदीप ताथोड, अनिकेत उभाड, आकाश राऊत, सुप्रित पाटसकर यांनी त्या घुबडाच्या अंगावरील चिनी मांजा काढून त्यास जीवदान दिले. वनविभागाचे कर्मचारी मंगेश राऊत यांनी त्या मोठ्या घुबडाला वाहनाने आपल्या सोबत नेले. एवढे मोठे मादी जातीचे घुबड पक्षी पाहून परिसरातील सर्व नागरिक चकीत झाले.
अमरावती जिल्ह्यात चिनी मांज्यातून सोडवले तीन फूट लांबीचे घुबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 13:32 IST
गांधीपूल येथील विणकर वसाहतीतील गृहस्थ रमेश नाडगे यांना मांज्याच्या धाग्यात गुरफटलेल्या अवस्थेत पक्षी दिसून आला. त्यांनी तत्काळ झाडावर चढून त्याला खाली आणले.
अमरावती जिल्ह्यात चिनी मांज्यातून सोडवले तीन फूट लांबीचे घुबड
ठळक मुद्देवनविभागाच्या स्वाधीनविणकर वसाहतीतील घटना