दहशदवाद्यांच्या तावडीतून तीन कर्मचाऱ्यांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:13 AM2021-01-22T04:13:06+5:302021-01-22T04:13:06+5:30

(फोटो आहेत) अमरावती : कॅम्प भागातील खासगी मॉलमध्ये तीन कर्मचाऱ्यांना दहशदवादांनी गुरुवारी सकाळी बंदीस्त केले. याची ...

Three employees rescued from the clutches of terrorists | दहशदवाद्यांच्या तावडीतून तीन कर्मचाऱ्यांची सुटका

दहशदवाद्यांच्या तावडीतून तीन कर्मचाऱ्यांची सुटका

Next

(फोटो आहेत)

अमरावती : कॅम्प भागातील खासगी मॉलमध्ये तीन कर्मचाऱ्यांना दहशदवादांनी गुरुवारी सकाळी बंदीस्त केले. याची माहिती पोलिसांना मिळताच विविध पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन दहशदवाद्यांच्या तावडीतून तीन कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली. हा थरार गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उपस्थित नागरिकांनी अनुभवला! ही खरीखुरी दहशवाद्यांची घटना नव्हती तर शहर पोलिसांनी राबविलेले ‘मॉक ड्रील’ होते.

पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशाने प्रजासत्ताक दिन, तसेच आगामी काळात होऊ घातलेले विविध सण उत्सव लक्षात घेता, दहशदवादविरोधी कक्ष, जलद प्रतिसाद पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, गाडगेनगर पोलिसांचे पथक गुरुवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास बियाणी चौकातील एका खासगी मॉलजवळ मॉक ड्रील घेण्यात आले. यापुर्वीच मॉक ड्रीलची माॅलच्या व्यवस्थापकांना सूचना देण्यात आली होती. मात्र, याची नागरिकांना कल्पना नव्हती. मॉक ड्रील दरम्यान माॅलच्या बेसमेंटमधील पार्किंगमध्ये दोन दहशदवाद्यांनी तीन कर्मचाऱ्यांना बंदिस्त केल्याचे भासवून सर्वप्रथम पीएसआय कपिल मिश्रा यांच्या नेतुत्वात क्युआरटी प्रशिक्षित कमांडो यांनी कुशल कवायतींचे प्रदर्शन करून पार्किंगमध्ये प्रवेश करून दहशदवाद्यांच्या तावडीतून चाणाक्षपणाने कर्मचाऱ्यांची सुटका केली. दहशदवाद्यांनी काही घातपात घडविण्याच्या दृष्टीने इतरत्र स्फोटक वस्तू ठेवली असण्याची शक्यता लक्षात घेऊन बॉम्ब शोधक व नाशक (बीडीडीएस) पथकाला पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक जयंत राऊत यांच्या नेतृत्वात पथकाने श्वानच्या सहाय्याने मॉलचा परिसरातील वाहनांची तपासणी केली. दरम्यान पार्किंगमध्ये एक बॉम्बसदृश वस्तू आढळून आली. त्यानंतर बीडीडीएस पथकाने त्यावर उपाययोजना करून बाॅम्बसदृश वस्तूृ शिताफीने बेसमेंटमधून मॉलच्या परिसराबाहेर काढून बॉम्ब निकामी करण्यात आले. मॉक ड्रीलचे दहशवादविरोधी पथक अकोला युनिट व दहशदवाद विरोधी कक्षाच्या अधिकारी व अंमलदारांनी मॉलमधील ग्राहकांच्या गर्दीवर तसेच रहदारीवर नियंत्रण ठेवले. मॉक ड्रीलमध्ये दहशदवादविरोधी पथक अकोला युनिट येथील पोलीस निरीक्षक राजेश भुयार, एपीआय राजेश खेरडे व पाच कर्मचारी, दहशदवादविरोधी कक्षाचे प्रभारी पीआय नीलिमा आरज, चार अंमलदार, बॉम्ब शोधक व नाशक पथकांचे पोलीस निरीक्षक जयंत राऊत व सात अंमलदार, क्युआरटी पथकाचे पीएसआय कपिल मिश्रा व त्यांच्या पथकातील १४ अंमलदार, गाडगेनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे व अंमलदार यांनी मॉक ड्रीलमध्ये सहभाग नोंदविला. मॉक ड्रील दरम्यान नागरिकांना किंवा ग्राहकांना कुठल्याही प्रकारची इजा पोहचू नये, याची काळजी घेण्यात आली. पूर्वी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, नंतर मॉक ड्रील असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Web Title: Three employees rescued from the clutches of terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.