शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

पाच जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूचा वाढता विळखा; तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 19:49 IST

१७ रुग्णांवर उपचार सुरू

-वैभव बाबरेकरअमरावती : जीवघेण्या स्वाईन फ्लूने विभागातील तीन जणांचे मृत्यू झाले. अद्यापही १७ रुग्णांवर औषधोपचार सुरू आहे. या आजाराने अमरावतीअकोला जिल्ह्यात पाय पसरल्याचे आढळून आले आहे. मात्र, आरोग्य विभागातर्फे अद्याप ठोस पावले उचलली गेली नसल्याचे चित्र आहे.  ऊन व थंडी अशा वातावरणाच्या बदलामुळे विदर्भ व्हायरलच्या विळख्यात सापडला आहे. त्यातच वातावरण बदलल्यामुळे स्वाईन फ्लूसारख्या जीवघेण्या आजाराच्या विषाणुचाही प्रकोप हळूहळू वाढू लागला आहे. गतवर्षात स्वाईन फ्लूने विभागात कहरच केला. शासकीय व खासगी रुग्णालयांतील चार ते पाच जणांचे मृत्यूदेखील झाले. तब्बल १२५ रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. आता पुन्हा स्वाईन फ्लूने पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. विभागातील अमरावती, अकोला, यवमताळ, बुलडाणा व वाशिम येथील आरोग्यविषयक कामकाज अकोला येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत चालते. या कार्यालयातील नोंदीनुसार, जानेवारी ते फेब्रुवारीअखेरपर्यंत अमरावती व अकोला जिल्ह्यातल स्वाईन फ्लूचे १७ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय अमरावती येथील दोन व अकोट येथील एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. या आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्या अनुषंगाने जनजागृती सुरू केली आहे. आजारी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना टॅमी फ्लू गोळ्याद्वारे औषधोपचार सुरू करण्यात आला आहे. 

आठ हजार टॅमी फ्लूचे वाटपआरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत पाचही जिल्ह्यांतील जिल्हा सामान्य रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुमारे आठ हजार टॅमी फ्लू गोळांचा पुरवठा करण्यात आला आहे. स्वाईन फ्लू संशयितांवर टॅमी फ्लूचा उपचार सुरू आहे. 

इर्विन रुग्णालयात दोन संशयितअमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी स्वाईन फ्लूचे दोन संशयित रुग्ण दाखल झाले. त्यांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 

दोन महिन्यांत स्वाईन फ्लूने तिघांचा मृत्यू झाला. १७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. या आजाराच्या प्रतिबंधसाठी जनजागृती सुरू आहे. पाचही जिल्ह्यांतील रुग्णालयांत टॅमी फ्लू गोळांचा पुरवठा केला आहे. डॉ. आर.एफ. फारुकी, आरोग्य उपसंचालक, अकोला 

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूAmravatiअमरावतीVidarbhaविदर्भAkolaअकोला