शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीमध्ये अपघातात तिघांचा मृत्यू, दिवाळीच्या उत्साहावर विरजण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 19:07 IST

शहरात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याने दिवाळी सणाच्या उत्साहावर विरजण पडले. कोंडेश्वर मार्गावर चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य

अमरावती : शहरात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याने दिवाळी सणाच्या उत्साहावर विरजण पडले. कोंडेश्वर मार्गावर चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य, तर ट्रान्सपोर्ट नगरात ट्रकखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू झाला. संगीता लांजेवार (४०) व चंदू लांजेवार (४५, दोन्ही रा. सातरगाव) या दाम्पत्यासह कय्युम खां समद खां (६५,रा.आझाद कॉलनी) अशी मृतांची नावे आहेत. 

या अपघातात दुचाकीवरील लांजेवार दाम्पत्यांचा मुलगा साहिल व चारचाकीतील राहुल जीवन गिरी (४०), साहिल राहुल गिरी (६), दक्ष राहुल गिरी (५) व श्रेयस रवींद्र गिरी (८,सर्व रा. गिरीराज कॉलनी, बडनेरा) गंभीर जखमी झाले. कय्युम खां समद खां (६५) सोमवारी सकाळी जमील कॉलनीतून पायी जात होते. दरम्यान गाडगेनगर हद्दीतील ट्रान्सपोर्टनगरात उभा असलेला एमएच २८बी-८०८९ क्रमांकाचा ट्रक मागे वळण घेत असताना कय्युम खां ट्रकच्या मागील चाकात चिरडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी ट्रकचालक ज्ञानेश्वर आनंद धोटे (३०,रा महेंद्र कॉलनी) याला अटक करून ट्रक जप्त केला. बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील चक्रधर पेट्रोलपंपानजीक चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्यांचा मृत्यू झाला, चार लहान मुले गंभीर जखमी झाले. सातरगावातील रहिवासी चंदू लांजेवार, त्यांची पत्नी संगीता लांजेरावर व मुलगा साहिल लांजेवार हे तिघेही सोमवारी सायंकाळी दुचाकीने बडनेराकडून सातरगावाकडे जात होते. दरम्यान मागून येणाºया भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील लांजेवार दाम्पत्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा साहिल व कारमधील गिरी कुटुंबातील चारजण जखमी झाले. माहितीवरून पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस शिपाई विशाल भोसले व अशफाक यांनी घटनास्थळ गाठून जखमींना तत्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालया आणले.  

अनधिकृत पार्किंगचा बळी-ट्रान्सपोर्टनगरात ट्रकचालक रस्त्यावरच अनधिकृत ट्रक पार्किंग होत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनधिकृत पार्किंगमुळे कय्युम खां यांचा बळी गेला. यासंदर्भात मध्यंतरी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यावेळी पोलिसांनी थातुरमातूर कारवाई  केल्याने पुन्हा ट्रान्सपोर्टनगरात रस्त्यावर ट्रकचालकांची मनमानी वाढली आहे. कोंडेश्वरजवळील एक्सप्रेस हाय-वेवर भरधाव वाहनांची वर्दळ वाढली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीAccidentअपघात