शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 19:12 IST

पावसापासून बचावासाठी झाडाखाली आसरा घेणा-या दोन महिलांसह एका इसमाचा वीज कोसळून मृत्यू झाला.

अमरावती : पावसापासून बचावासाठी झाडाखाली आसरा घेणा-या दोन महिलांसह एका इसमाचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास पूर्णानगर ते मार्की फाटा या मार्गावर घडली. सैयद नुरुद्दीन सैयद बद्रोद्दीन (६५, रा. अंजनगावसुर्जी), सोनाली गजानन बोबडे (३४, बोपापूर, ह.मु. बडनेरा) व शोभा संजय गाठे (४५,रा. विलायतपुरा, अचलपूर) अशी मृतांची नावे आहेत. त्यांना मृतावस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते.  अमरावती जिल्ह्यातील काही परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. याच वेळी अंजनगावसुर्जीतील रहिवासी सैयद नुरुद्दीन व त्यांचा मुलगा सैयद मोईद अमरावतीवरून अंजनगाव सुर्जीला दुचाकीने परत निघाले होते. बडनेरातील रहिवासी  स्वप्निल वाठ बहीण सोनाली बोबडे यांना दुचाकीवर घेऊन करजगाव येथे मामाकडे निघाले होते, तर अचलपूर येथील रहिवासी रमेश लक्ष्मण नागले हे बहीण शोभा संजय गाढे (४५) यांना दुचाकीवर घेऊन अमरावतीवरून अचलपूरला जात होते. यादरम्यान अचानक विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे तिन्ही दुचाकीस्वारांनी वलगाव ते आसेगाव पूर्णा मार्गातील पूर्णानगरनजीक रस्त्यालगत दुचाकी लावून झाडाखालीच आसरा घेतला. या सहा जणांसोबत तेथे आणखी दोन व्यक्ती झाडाखाली उभ्या होत्या. दरम्यान, अचानक विज कडाडली आणि सैय्यद नुरुद्दीन, सोनाली बोबडे व शोभा गाठे विजेच्या धक्क्याने खाली कोसळले. विजेच्या आवाजाने झाडाखाली उभे असलेले सर्व जण सुन्न झाले होते. त्यांनी खाली कोसळलेल्या आपआपल्या नातेवाइकांना सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते बेशुद्धावस्थेत पडून होते. त्यांनी मदतीसाठी रस्त्यावरून जाणा-या वाहनांची मदत मागितली. धारणीवरून अमरावतीकडे येणाºया ‘१०२’ रुग्णवाहिकेचे चालक मनोज बरडे यांनी वाहन थांबविले. त्यानंतर पूर्णानगरचे सरपंच गजेंद्र गहरवाल व सामाजिक कार्यकर्ता प्रवीण खेकडे यांनी सैयद नुरुद्दीन यांना वाहनात टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. त्याचप्रमाणे १०८ रुग्णवाहिकाद्वारे सोनाली बोबडे व शोभा गाठे यांना रुग्णालयात आणले गेले. येथे मृतकाचे नातेवाईक व नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. या घटनेबद्दल नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली गेली. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शवगारात ठेवण्यात आले आहेत.

मोबाइल कॉल लावताच खेचली गेली वीजझाडाखाली आठ जण उभे असताना, एका व्यक्तीने मोबाइलवरून कुणाला तरी कॉल केला आणि अचानक वीज त्यांच्याभोवती खेचली गेली. विजेच्या प्रचंड कडकडाटाने झाडाखाली उभे असणा-यांना हादरा बसला. विजेच्या स्पर्शाने तिघे खाली कोसळताच मोबाइल कॉल करणारा तेथून पळून गेला, अशी माहिती जखमी स्वप्निल वाठ यांनी दिली. 

दोन भावांसमोर बहिणींचा मृत्यू स्वप्निल वाठ हे बहीण सोनाली यांना करजगाव येथे मामाकडे नेत होता, तर रमेश नागले हे बहीण शोभा यांना घेऊन अचलपूरला जात होते. यादरम्यान त्यांनी पावसामुळे झाडाखाली आसरा घेतला. नेमका तेव्हाच काळाने घाला घातला.

टॅग्स :Amravatiअमरावती