शासकीय कार्यालयांना तीन दिवस टाळे

By Admin | Updated: January 24, 2015 00:02 IST2015-01-24T00:02:00+5:302015-01-24T00:02:00+5:30

शासकीय कार्यालयाना सलग तिन दिवस सुटया असल्याने २४ ते २६ जानेवारीपर्यत टाळे राहणार आहे. यामध्ये केवळ सोमवारी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे ...

Three days to government offices | शासकीय कार्यालयांना तीन दिवस टाळे

शासकीय कार्यालयांना तीन दिवस टाळे

अमरावती : शासकीय कार्यालयाना सलग तिन दिवस सुटया असल्याने २४ ते २६ जानेवारीपर्यत टाळे राहणार आहे. यामध्ये केवळ सोमवारी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे सकाळच्या सत्रातील अवधी सोडला तर अधिकारी आणि कर्मचारी प्रशासकीय कामाच्या ताणातून सुट्यामुळे रिलॅक्स राहणार आहेत .
विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना २४ जानेवारीला चौथा शनिवार आहे तर २५ जानेवारीला रविवार आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन असल्यामुळे विविध शासकीय कार्यालयातील सकाळी साजरा होणारा ध्वजारोहण व यानिमित्त आयोजीत कार्यक्रम याचा अपवाद वगळता अधिकारी व कर्मचाऱ्यांना जवळपास अडीच दिवस शासकीय सुटया मिळाणार आहेत .या सुटयाच्या निमित्याने अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कुटुंबासमवेत तीर्थस्थळ ,पर्यटनस्थळ अशा ठिकाणी जाण्याचे बेत आखले आहेत. तर काहीनी घरीच थांबण्याला पसंती दिली आहे. सलग तीन दिवस शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना सुट्या लागून आल्याने याबाबत मागील काही दिवसापासून कर्मचाऱ्यामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. शासकीय कार्यालयाना सलग तीन दिवस सुटी असल्याने मात्र कार्यालयाना टाळे असणार आहेत. त्यामुळे विविध कामासाठी येणाऱ्या अभ्यागत यांना आपली शासकीय कामे करण्यासाठी मंगळवारीच मुहूर्त काढावा लागणार आहे .( प्रतिनिधी)

Web Title: Three days to government offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.