दुष्काळाचे तीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

By Admin | Updated: August 10, 2015 00:02 IST2015-08-10T00:02:45+5:302015-08-10T00:02:45+5:30

मागील वर्षी पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळस्थिती होती. पैसेवारी ४६ पैसे असल्याने शासनाने प्रचलीत नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना ...

Three crore farmers of drought | दुष्काळाचे तीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

दुष्काळाचे तीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

जिल्ह्याला पाऊणेनऊ कोटी : साडेतीन कोटींचे बँकांना वाटप
अमरावती : मागील वर्षी पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळस्थिती होती. पैसेवारी ४६ पैसे असल्याने शासनाने प्रचलीत नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी २४२ कोटी ९९ लाख ६९ हजार ४५४ रुपयांचा निधी उपलब्ध केला होता. यामध्ये वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना यंदा पुन्हा ८ कोटी ७५ लाखांचा निधी शासनाद्वारा जिल्ह्यास वितरित करण्यात आला आहे.
या दुष्काळ निधीचे २९ हजार २९९ खातेदारापैकी ७ हजार ४११ शेतकऱ्यांसाठी ३ कोटी ४८ लाख ८६ हजार १६१ रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात बँकेत जमा करण्यात आलेला आहे. यापैकी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात ३ हजार २०४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ कोटी ९१ लाख २९ हजार ९८० रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १ कोटी २४ लाख ९ हजार ५७०, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३६ लाख ६९ हजार ३७०, दर्यापूर तालुक्यात ५१ लाख ६० हजार २००, अंजनगाव तालुक्यात ७४ लाख ६ हजार ४८०, वरुड तालुक्यात ५० हजार व चिखलदऱ्यात ४३, ४ हजार ३६० रुपये सद्यस्थिती जमा करण्यात आले आहे. ही टक्केवारी ३९.८७ आहे. यामध्ये भातकुली, तिवसा, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी, धारणी तालुके निरंक आहेत.
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी अमरावती तालुक्यात ३ हजार शेतकऱ्यांसाठी १ कोटी २४ लाख ९ हजार ५७०, भातकुली तालुक्यात ४४२ शेतकऱ्यांसाठी २१ लाख १० हजार ७१५, नांदगाव तालुक्यात ६७५ शेतकऱ्यांसाठी ३६ लाख ६९ हजार ३७०, दर्यापूर तालुक्यात १ हजार १४१ शेतकऱ्यांसाठी ५१ लाख ६० हजार २००, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ७४ लाख ६ हजार ४८०, चांदूरबाजार तालुक्यात १२ लाख ८० हजार ७११, मोर्शी तालुक्यात ५१७ शेतकऱ्यांसाठी, २३ लाख ६४ हजार ७५५, वरुड तालुक्यात १२ शेतकऱ्यांसाठी ५० हजार व चिखलदरा तालुक्यात ९६ शेतकऱ्यांसाठी ४ लाख ३४ हजार ३६० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात कमी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.
गतवर्षीचा दुष्काळ, त्यानंतर रबी हंगामात अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असतानाच दुष्काळाचा प्रलंबित निधी ऐन अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना मिळाला आहे. (प्रतिनिधी)
यंदा वितरित
केलेला मदत निधी
गतवर्षी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी पाऊणेनऊ कोटी रुपये शासनाने जिल्ह्यात वितरित केले आहे. यामध्ये अमरावती तालुक्याला २ कोटी २५ लाख ६८ हजार १२५, भातकुली २५ लाख, धामणगाव ८२ लाख २८ हजार, नांदगाव १ कोटी ४० लाख, दर्यापूर ९० लाख, अंजनगाव १ कोेटी, चांदूररेल्वे ३० लाख, चांदूर बाजार १ कोटी, वरुड ६० लाख, धारणी ९ लाख ५५ हजार ८०, व चिखलदरा तालुक्यास १२ लाख ४८ हजार ७९५ रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

Web Title: Three crore farmers of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.