वाहन खरेदीत फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 06:00 AM2019-11-21T06:00:00+5:302019-11-21T06:00:58+5:30

गुरुकृपा कॉलनीतील रहिवासी दिलीप चिन्नास्वामी दोन्ती (४५) यांनी ७ ऑक्टोबर २०१९ रोजी गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली होती. त्यांनी ओएलएक्सच्या माध्यमातून एमएच २७ बीएक्स ३२८४ या वाहनाच्या खरेदीचा व्यवहार आरोपींशी केला होता. सौदा पक्का झाल्यानंतर आरोपींनी दिलीप यांना १ लाख ५६ हजार रुपये दिले.

 Three arrested for fraud in vehicle purchase | वाहन खरेदीत फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक

वाहन खरेदीत फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक

Next
ठळक मुद्देमिनी ट्रॅव्हल्स जप्त : मोठे रॅकेट गळाला लागण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मिनी ट्रव्हल्स खरेदी करणाºया तिघांना फसवणूक प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी पुणे व सोलापुरातून अटक केली. रणजित तुकाराम कुंभार (रा. वाकाव कोकाट गल्ली, अंगार, सोलापूर, ह.मु. माळीवाडी पुणे), धनंजय वसंत कुंभार व श्रीकांत तुकाराम कुंभार (२९,रा. वाकाव, म्हाडा, जि. सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ८ लाख ६ हजारांची मिनी ट्रॅव्हल्स जप्त करण्यात आली. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
गुरुकृपा कॉलनीतील रहिवासी दिलीप चिन्नास्वामी दोन्ती (४५) यांनी ७ ऑक्टोबर २०१९ रोजी गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली होती. त्यांनी ओएलएक्सच्या माध्यमातून एमएच २७ बीएक्स ३२८४ या वाहनाच्या खरेदीचा व्यवहार आरोपींशी केला होता. सौदा पक्का झाल्यानंतर आरोपींनी दिलीप यांना १ लाख ५६ हजार रुपये दिले. उर्वरित ६ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश दिला. त्यानंतर ते वाहन घेऊन पसार झाले. दिलीप यांनी सदर धनादेश बँकेत टाकला असता, आरोपींचे बँक खाते बंद असल्याचे समजले. त्यामुळे आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे दिलीप यांच्या निदर्शनास आले. त्यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके व पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात डीबीचे प्रमुख पोलीस हवालदार शेखर गेडाम, सतीश देशमुख, सुभाष पाटील, रोशन वऱ्हाडे यांच्या पथकाने सोलापूर व पुण्यातून आरोपींना अटक केली. या चौकशीतून मोठे रॅकेट गळाला लागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title:  Three arrested for fraud in vehicle purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.