शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

चाकूने वार करून लुटण्याचा प्रयत्न करणारे तिघे गजाआड; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

By प्रदीप भाकरे | Updated: July 31, 2023 17:09 IST

कोतवाली पोलिसांची ताबडतोब कारवाई

अमरावती : पायदळ घरी जात असलेल्या एका १९ वर्षीय चाकूने वार करून त्याच्याजवळील मोबाइल हिसकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना शहर कोतवाली पोलिसांनी ३० जुलै रोजी अटक केली. आरोपी तरूणांकडून ६० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही घटना २८ जुलै रोजी रात्री १०.२० वाजताच्या सुमारास पटवा चौक येथे घडली होती. अवघ्या काही तासात कोतवाली पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली.            

अटक आरोपींमध्ये राज रोहीत देऊळकर (१९), कृष्णा संतोष श्रीवास (२१) व पीयूष संजू बरोरे (१८ सर्व रा. मसानगंज) यांचा समावेश आहे. २८ जुलै रोजी रात्री मसानगंज येथील रहिवासी नजमुल अयुब मंडल (१९) हा कंपनीतील काम आटोपून सहकाऱ्यांसह पायदळ घरी जात होता. एका सहकाऱ्याचा मोबाइल बघत जात असताना दुचाकीवरून तीन लुटारू नजमुल याच्याजवळ आले. एकाने त्याच्याजवळील मोबाइल हिसकाविण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्याने हाताला झटका देत तेथून पळ काढला. त्यावेळी आरोपींनी पाठलाग करून नजमुलला पटवा चौक येथे पकडले. चाकूने वार करीत आरोपींनी त्याच्याकडील मोबाइल हिसकाविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी परिसरातील नागरिक गोळा झाल्याने लुटारूंनी दुचाकीने पळ काढला होता. या प्रकरणी नजमुल याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला.

त्वरेने तपास, आरोपी ट्रॅप

ठाणेदार विजयकुमार वाकसे यांच्या नेतृत्वातील टिम कोतवाली तपास करत असताना त्या गुन्ह्यात राज, कृष्णा व पियूष यांचा हाथ असल्याचे समोर आल्यावर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चाकू जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार विजयकुमार वाकसे, पोलीस निरीक्षक ज्योती विल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंगराव जाधव, मलिक अहेमद, प्रमोद हरणे, आशिष इंगळेकर, पंकज अंभोरे, आनंद जाधव यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीtheftचोरीArrestअटक