सेना शहराध्यक्षासह तिघांना अटक
By Admin | Updated: January 15, 2017 00:04 IST2017-01-15T00:04:26+5:302017-01-15T00:04:26+5:30
मोझरी येथील अवैध दारु विक्रेता महेंद्र ठाकूर हत्याप्रकरणाी शिवसेनेच्या शहर प्रमुखासह अन्य दोन युवकांना पोलिसांनी शनिवारी अटक केली.

सेना शहराध्यक्षासह तिघांना अटक
महेंद्र ठाकूर हत्या प्रकरण : डाव फसला
तिवसा : मोझरी येथील अवैध दारु विक्रेता महेंद्र ठाकूर हत्याप्रकरणाी शिवसेनेच्या शहर प्रमुखासह अन्य दोन युवकांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याचे अन्य ७ साथीदार पसार आहेत. महेंद्रचा साथीदार संदीप ढोबाळे यांची जुन्या वादातून हत्या करण्याचा कट होता. परंतु तो पळाल्याने महेंद्रशी बाचाबाची होऊन त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती तिवसा पोलिसांनी दिली.
गणेशोत्सवापूर्वी वर्गणी मागण्यावरून फिर्यादी संदीप ढोबाळे व आरोपींचा वाद झाला होता .संदीपला यावेळी मारहाण करण्यात आली होती. प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी संदीपने यवतमाळच्या कुख्यात प्रवीण दिवटे गँगमधील काही सदस्याला बोलविले होते.
परंतु, त्यांना घटनेतील आरोपी मिळाले नाही. त्यांनी अन्य एका युवकाला मारहाण करीत त्याची गाडी जाळली होती. तेव्हापासून या दोन्ही गटात खुमखुमी होती. शुक्रवारी महेंद्र ठाकूर व संदीप ढोबाळे हे कामानिमित्त तिवसा तहसील कार्यालयात आले होते. तेथेच त्यांना कटाचा सुगावा लागला. हे दोघेही नागपूरच्या दिशेने एका दुचाकीने पळाले. मात्र, कृष्णा ढाब्याजवळ दुचाकीतील पेट्रोल संपल्याने महेंद्र तेथे थांबला व संदीप पळाल्याने तो हल्लेखोरांपासून बचावला.
कुऱ्ह्यातून आरोपींना अटक
तिवसा : यावेळी संदीप ढोबाळे याला मारहाण करायला आलेल्या युवकांनी महेंद्र ठाकूर यांच्याशी बाचाबाची झाली व वाद विकोपाला गेल्याने आरोपींनी धारदार शस्त्रांनी महेंद्रच्या डोक्यावर व छातीवर वार केले. यातच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला.
या घटनेची तक्रार संदीप ढोबाळे यांनी तिवसा ठाण्यात केली. अमरावती येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री तिवसा शहरप्रमुख अमोल पाटील, सागर सुरेश वाघमारे व स्वप्नील अनिल वानखडे या तीन युवकांना कुऱ्हा येथून अटक केली. घटनेतील शिवसेना नगरसेवक किशोर सातपुते, सोनु लांडगे, राहुल बाभुळकर, अन्य सात आरोपी अद्याप पसार आहेत. पोलिसांनी आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली आहे. तिवसा येथे अद्यापही तणावसदृश स्थिती आहे. तिवस्याचे ठाणेदार दिनेश शेळके पुढील तपास करीत आहे. (प्रतिनिधी)