अमरावती येथील डॉक्टरला लुटणारे अकोल्यातील तिघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:15 IST2021-06-09T04:15:24+5:302021-06-09T04:15:24+5:30

अमरावती : शहरातील वैद्यकीय व्यावसायिक रीतेश चौधरी यांना ५ एप्रिल रोजी त्यांची कार अडवून व धारदार शस्त्राच्या धाकावर लुटणाऱ्या ...

Three arrested in Akola for robbing a doctor in Amravati | अमरावती येथील डॉक्टरला लुटणारे अकोल्यातील तिघे जेरबंद

अमरावती येथील डॉक्टरला लुटणारे अकोल्यातील तिघे जेरबंद

अमरावती : शहरातील वैद्यकीय व्यावसायिक रीतेश चौधरी यांना ५ एप्रिल रोजी त्यांची कार अडवून व धारदार शस्त्राच्या धाकावर लुटणाऱ्या अकोल्यातील तीन गुंडांना तेथील स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली.

डॉ. रीतेश चौधरी हे ५ एप्रिल रोजी अकोला येथून त्यांच्या कारने अमरावतीकडे येत असताना शिवणीनजीक त्यांच्याशी कुख्यात गुंड अनिल गजानन घ्यारे (रा. आंबेडकरनगर), अनिल ऊर्फ जॉन नंदू गुडदे आणि सुनील मारुती खिल्लारे (तिघेही राहणार एमआयडीसी) यांनी वाद घातला. त्यांची कार अडवून धारदार शस्त्राच्या बळावर दागिने, रोख रक्कम व मुद्देमाल पळविला. या प्रकरणाची तक्रार अकोल्याच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आली. एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या समांतर तपासात अनिल घ्यारे, अनिल गुडदे व सुनील खिल्लारे हे तिघे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Web Title: Three arrested in Akola for robbing a doctor in Amravati