तीन आरोपींना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:12 IST2021-05-24T04:12:24+5:302021-05-24T04:12:24+5:30

अमरावती : डोळ्यांत मिरचीपूड फेकून चाकुहल्ला करीत १९ लाख ५० हजारांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात तिन्ही आरोपींना ...

Three accused remanded in police custody till May 26 | तीन आरोपींना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी

तीन आरोपींना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी

अमरावती : डोळ्यांत मिरचीपूड फेकून चाकुहल्ला करीत १९ लाख ५० हजारांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात तिन्ही आरोपींना न्यायालयाने २६ मेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अनिकेत ज्ञानेश्वर जाधव (२४, रा. अकोली), साहिल नरेश मेश्राम (२२ रा. माताफैल बडनेरा) व यश सुनील कडू (२४ रा. जेवडनगर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. मात्र, लुटमार प्रकरणात चार आरोपी असून, अद्यापही एक आरोपी पसार आहे. पसार असलेल्या आरोपीनेच फिर्यादी मनोज चौधरी याच्यावर चाकुहल्ला केल्याची बाब सिटी कोतवाली पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. पोलिसांनी चौथ्या आरोपीच्या घरी जाऊन पाहणी केली. परंतु, तो पसार झाला आहे. त्याचा मोबाईल बंद असल्यामुळे लोकेशन मिळणे पोलिसांना कठीण झाले आहे. पसार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांनी दिली.

Web Title: Three accused remanded in police custody till May 26