शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात परतवाडा-धारणी-खंडवा मार्गावर अवघ्या २४ तासांत तीन अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 14:07 IST

Amravati : ट्रॅव्हल्सनंतर चारचाकी दरीत उतरली, आरटीओ वाहन झाडावर आदळले, सुदैवाने जीवित हानी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मंगळवारी सायंकाळी सुसाट वेगाने धावणाऱ्या ट्रॅव्हल्सचा मांगिया गावानजीक अपघात झाल्यानंतर, कोलकासनजीक चारचाकी दरीत कोसळून त्यातील प्रवासी किरकोळ जखमी झाले. बुधवारी सकाळी अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सची तपासणी आणि चौकशी करण्यासाठी जाणाऱ्या आरटीओच्या चारचाकी वाहनालाही अपघात झाला. यात चालकासह अधिकारी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. २४ तासांमध्ये तीन अपघातांची मालिकाच परतवाडा-धारणी-खंडवा मार्गावर घडली. 

धारणी-परतवाडा मार्गावर सेमाडोहच्या भवई घाटात अमरावतीहून धारणीकडे जाणाऱ्या आरटीओ वाहनाला अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. खराब रस्त्यावर भरधाव वाहनाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

येथे चालते जीवघेणी शर्यतपरतवाडा-धारणी मार्गावर मध्य प्रदेशातून ये-जा करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात आहेत. यात प्रवासी गुरांसारखे कोंबून नेले जातात. एसटी बसपुढे प्रवासी मिळावे, यासाठी खासगी ट्रॅव्हल्सची जीवघेणी शर्यत रस्त्यावरची नेहमीच बघायला मिळते. 

पूर्वी पाच ठार आठवणीला उजाळायाच मार्गावर सेमाडोहनजीक जवाहर कुंड पुलाखाली खासगी ट्रॅव्हल्स कोसळून पाच जण ठार झाले होते. जीवाचा थरकाप उडविणाऱ्या आठवणींचा उजाळा अनेकांना झाला. चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेला अपघात पुन्हा झाल्याने यावर नियंत्रण कोणाचे, हा प्रश्न पुढे आला.

आणि रस्त्याने यम धावत होता...मंगळवारी सायंकाळी ट्रॅव्हल्स कलंडण्यापूर्वी नागपूरहून बऱ्हाणपूरसाठी निघालेली ही खासगी ट्रॅव्हल्स मेन पट्टा तुटल्याने परतवाडा येथे दुरुस्त करण्यात आली. त्यामुळे एक तास उशीर झाला. त्यावर नेमण्यात आलेल्या चालकाची घाटवळणाची पहिलीच वेळ असतानाही वेळ कापण्यासाठी तो भरधाव वेगाने वाहन चालवत होता. प्रवासी त्याच्यावर ओरडले, पण काहीही परिणाम झाला नाही. अखेर मांगियानजीकच्या वळणावर बस कोसळून अपघात झाला.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती