जीवे मारण्याची धमकी

By Admin | Updated: June 18, 2016 23:59 IST2016-06-18T23:59:45+5:302016-06-18T23:59:45+5:30

वलगावातील रहिवासी प्रदीप मुंदाने यांच्या मुलावर सहा महिन्यांपूर्वी आरोपींनी प्राणघातक हल्ला चढविला होता.

Threats to kill | जीवे मारण्याची धमकी

जीवे मारण्याची धमकी

अमरावती : वलगावातील रहिवासी प्रदीप मुंदाने यांच्या मुलावर सहा महिन्यांपूर्वी आरोपींनी प्राणघातक हल्ला चढविला होता. यावेळी वलगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदविला होता. मात्र, दरम्यानच्या काळात ती तक्रार परत घेण्यासाठी आरोपींनी प्रदीप मुंदानेला जीवे मारण्याची धमक्या देण्यास सुरुवात केली, असा आरोप मृत प्रदीप मुदांने यांची मुलगी पूजा प्रदीप मुंदाने (१८) हिने पोलीस तक्रारीत केला आहे. या धमक्यामुळे माझ्या वडिलांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे पूजाने पोलिसांना सांगितले. पुजाने आरोपी नलिनी मुरलीधर जवंजाळ, अमोल मुरलीधर जवंजाळ, मुरलीधर जवंजाळ व प्रकाश तळेकार यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. १४ जून रोजी प्रदीप मुंदाने यांनी विष प्राशन केले. त्यांना तत्काळ इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान शनिवारी दुपारी मृत्यू झाला.

Web Title: Threats to kill