शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

लैंगिक शोषणानंतर ‘ते’ व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, विवाहितेशी वारंवार बळजबरी

By प्रदीप भाकरे | Updated: October 14, 2023 14:08 IST

सामाजिक बदनामीच्या भीतीपोटी तिने बाळगले मौन

अमरावती : एका विवाहितेला प्रेम जाळात अडकवून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. तर गाफीलक्षणी काढलेले फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिचे सर्वस्व लुटण्यात आले. ऑगस्ट २०२२ पासून ती अत्याचाराची मालिका चालली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी १३ ऑक्टोबर रोजी विवाहितेच्या तक्रारीवरून आरोपी शुभम साहू (रा. अमरावती) याच्याविरुद्ध बलात्कार व बदनामीचा गुन्हा दाखल केला.             तक्रारीनुसार, पीडितेच्या नातेवाइकांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून ते नेहमी बाहेर गावी जात असतात. मुले शाळेत गेल्यानंतर ती एकटीच घरी राहत होती. अशातच वर्षभरापूर्वी तिची ओळख तिच्या भावाच्या मित्रासोबत झाली. दोघांमध्ये मोबाइल क्रमांकाची आदानप्रदान झाली. संवाद वाढला. ते परस्परांना व्हॉटस् ॲपवर मेसेज करू लागले. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. गतवर्षीच्या ऑगस्टमध्ये तो पीडितेच्या घरी आला. तिला शरीर सुखाची मागणी केली. तिने नकार देऊनही त्याने तिच्यावर अत्याचार केला.

संसाराच्या भीतीपोटी

आपली बदनामी हाईल. पतीला माहीत झाले तर तिचा संसार तुटेल, या भीतीपोटी तिने कोणालाही सांगितले नाही. तेव्हापासून आरोपी हा तिला वारंवार शरीर सुखाची मागणी करत राहिला. नकार दिल्यास आपल्यातील संबंध समाजात सांगून बदनामी करेन, अशी धमकी देत होता. आरोपी शुभमने आपले काही फोटो व व्हिडीओ बनविले. ते व्हायरल करण्याची तो धमकी देत असल्याची विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणAmravatiअमरावती