गॅसदाहिनीमुळे वाचले हजार वृक्ष
By Admin | Updated: December 22, 2015 00:13 IST2015-12-22T00:13:32+5:302015-12-22T00:13:32+5:30
हिन्दू स्मशान संस्थानात गॅसदाहिनीद्वारे आतापर्यंत ६५३ पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गॅसदाहिनीमुळे वाचले हजार वृक्ष
एका प्रेतासाठी अडीच क्विंटल लाकूड : ६५३ पार्थिवांवर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार
वैभव बाबरेकर अमरावती
हिन्दू स्मशान संस्थानात गॅसदाहिनीद्वारे आतापर्यंत ६५३ पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे सुमारे एक हजारांवर वृक्ष कटाईपासून बचावले आहेत. या पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारामुळे निसर्गाचा मोठा ऱ्हास होण्यापासून वाचला आहे.
हिंन्दू धर्मातील परंपरेनुसार मानवी पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार केला जातो. बहुतांश नागरिक पार्थिवावर अग्निसंस्कारच करतात. लहान मुलांना दफन केले जाते, तर मोठ्यांवर अग्निसंस्कार करण्यात येते. ही परंपरा कित्येक वर्षांपासून आजतागायत सुरू आहे. एका पार्थिवावर अग्निसंस्काराकरिता हिन्दू स्मशानभूमीकडून २०० ते २५० किलो लाकूड विकत घ्यावा लागतो. त्याकरिता २ हजार ५०० रुपये आकारले जाते. त्यातच अग्निसंस्कारामुळे लाकूड जाळण्यात येत असल्यामुळे वृक्ष कटाई अधिक होते. मात्र, नोव्हेंबर २०१४ पासून हिन्दू स्मशान संस्थेने गॅसदाहिनी सुरू केल्यापासून लाकडाची मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत १ हजार ६०९ पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले. यादरम्यान ६५३ अत्यसंस्कार गॅसदाहिनीत झाले. अग्निसंस्कारासाठी शेकडो टन लाकूड, गॅसदाहिनीतील अंत्यसंस्कारासाठी ७३५ गॅससिलिंडर लागले. अग्निसंस्कारासाठी अडीच हजार रुपये खर्च तर गॅसदाहिनीतील अंत्यसंस्काराकरिता केवळ २०० रुपयेच अपेक्षित आहे. त्यातच अग्निसंस्काराच्या प्रक्रियेला सात ते आठ तास लागतात.
गॅसदाहिनीतील अत्यसंस्कार दोन तासांत होते. त्यामुळे गॅसदाहिनीत वेळ व पैसांची बचत झाल्याचेही दिसून येते. त्यातच महत्त्वाचे म्हणजे हजारो वृक्षसुध्दा वाचले आहे. अग्निसंस्काराच्या विधीसाठी लागणाऱ्या लाकडासाठी हजारो वृक्ष दरवर्षी कटाई केले जातात. यासाठी कामगारांवर खर्च होतो. मात्र, गॅसदाहिनीमुळे वर्षभरात एक हजार वृक्ष कटाईपासून वाचले आहेत.
लाकूड जाळल्यास प्रदूषणाचे प्रमाण कमी होत असले तरी इतक्या मोठ्या प्रमाणात लाकूड बजावला ही बाब महत्त्वाची आहे.