हजारांवर विद्यार्थी, सीसीटीव्ही किती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:18 IST2017-08-10T23:17:55+5:302017-08-10T23:18:22+5:30
श्वानभक्षणाच्या मुद्यावरून गुन्हे दाखल होणे आणि चोरलेले श्वान सोडविण्यासाठी नागरिक विद्यार्थ्यांच्या वसतिगृृहात शिरण्याइतपत स्थिती निर्माण झाली असतानाही.....

हजारांवर विद्यार्थी, सीसीटीव्ही किती?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : श्वानभक्षणाच्या मुद्यावरून गुन्हे दाखल होणे आणि चोरलेले श्वान सोडविण्यासाठी नागरिक विद्यार्थ्यांच्या वसतिगृृहात शिरण्याइतपत स्थिती निर्माण झाली असतानाही संस्थेच्या प्रांगणात आणि वसतिगृह परिसरात पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे लावून संस्थेने परप्रांतिय विद्यार्थ्यांची नियमबाह्य कृत्ये प्रभावीपणे नियंत्रित का केली नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अखत्यारितील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या परप्रांतीय विद्यार्थ्यानी पाळीव श्वान चोरले नि कापून खाल्ले. श्रीनाथवाडीतील रहिवाशाच्या तक्रारीनुसार याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यापूर्वी त्याच वस्तीतील नागरिकांनी ब्राऊनी नावाचे एक श्वान चक्क विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या खोलीतून सोडवले होते. हे प्रकार अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू असले तरी या दोन ताज्या घटना त्या परप्रांतिय विद्यार्थ्यांच्या कू्रर प्रवृत्तीची साक्ष पटविणाºया आहेत. श्वानाला 'खंडोबा'चा दर्जा देणाºया त्या परिसरातील मराठी माणसाला या प्रकाराने किती क्लेष होतो, ते त्यांच्या वेदनाकथनांवरून स्पष्ट होतेच.
शारीरिक शिक्षण, आयुर्वेद, नॅचरोपॅथी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन, समाजशास्त्र, योगा आदी नानाविध शाखांची रेलचेल असणाºया श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विस्तीर्ण प्रांगणात किमान हजारांवर विद्यार्थ्यांचा वावर असतो. संस्थेच्या आवारात वसतिगृहेही आहेत.
भिंतीलगतच्या श्रीनाथवाडी परिसरातील नागरिकांना त्या परप्रांतिय विद्यार्थ्यांचा त्रास होत असल्याच्या त्यांच्या अनेक दिवसांपासूनच्या तक्रारी आहेत. परप्रांतिय विद्यार्थी शहरातील नागरिकांचे जिणे विपरितरित्या प्रभावित करीत असतील तर संस्थेने अत्यंत संवेदनशीलपणे या मुद्याची दखल घ्यायला हवी. शिस्तीसाठी ओळखल्या जाणाºया या संस्थेतील विद्यार्थ्यांनी शिस्त मोडू नये याकडे कटाक्ष असायला हवा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांची आहे.
सुरक्षा भिंंतीवरून कोण विद्यार्थी उड्या मारून श्रीनाथवाडीत शिरतात? कोण वसतिगृहाच्या आवारात श्वानादी प्राणी कापतात, शिजवितात? रात्री किती वाजता ते बाहेर पडतात? महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेला अनुसरून ते वागतात की कसे, या बाबींचे पुरावे सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे सहज उपलब्ध झाले असते. वसतिगृह, महाविद्यालय परिसरात ही व्यवस्था असावी, असे शासनाचेही मत आहे. या व्यवस्थेला तिलांजली का देण्यात आली, हा प्रश्न अनुत्तरित आहे.