साठेबाजांनी धाडसत्रापूर्वीच केली हजारो क्विंटल डाळ लंपास

By Admin | Updated: October 27, 2015 00:26 IST2015-10-27T00:26:17+5:302015-10-27T00:26:17+5:30

तूर डाळीचे भाव गगणाला भिडले असून गोरगरिबांच्या जेवणातून तुर डाळ हद्दपार होत आहे.

Thousands of khantal dal lumpas have been done by the stock market before the yatra | साठेबाजांनी धाडसत्रापूर्वीच केली हजारो क्विंटल डाळ लंपास

साठेबाजांनी धाडसत्रापूर्वीच केली हजारो क्विंटल डाळ लंपास

अधिकाऱ्यांना आढळली ९२९ क्विंटल तूर डाळ : पथक रित्या हाताने परतले
वरूड : तूर डाळीचे भाव गगणाला भिडले असून गोरगरिबांच्या जेवणातून तुर डाळ हद्दपार होत आहे. शासनाने साठेबाजाविरुद्ध मोहीम सुरु असून तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने धाडसत्र राबविण्यापूर्वीच हजारो क्विंटल डाळ रफादफा केल्याची घटना तालुक्यात घडली. यामुळे धाडसत्रादरम्यान महसूल विभागाला रित्या हाताने परतावे लागले. परंतु हजारो क्विंटल तूरडाळ गेली कुठे? या विषयाची चर्चा आहे.
तालुक्यात ठोक व्यापाऱ्यांनी तूर डाळीचा हजारो क्विंटल साठा गोदामात ठेवला होता. अचानक भाव वाढल्याने दैनंदिनीतून डाळ हद्दपार झाली. विवाह सोळके, सार्र्वजनिक कार्यक्रमातसुध्दा तूर दाळ दिसत नाही. एवढेच नव्हे तर नवरात्री उत्सवातसुध्दा तुरीच्या डाळीऐवजी चना डाळ वापरण्यात आली. १८० ते १७० रुपये भावाने तुरीची डाळ विकली जात होती. राज्य शासनाने तूरडाळ साठेबाजांविरुध्द कारवाईची मोहीम सुरू केली. व्यापाऱ्यांच्या गोडावूनची तपासणी करून धाडसत्र राबविले. परंतु आधीच विल्हेवाट लावल्याने तहसीलदार, पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना रित्या हाताने परतावे लागले. अखेर हजारो क्विंटल डाळ गेली कुठे, हा चर्चेचा विषय आहे. पुरवठा विभागच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील ११ व्यापाऱ्यांकडे धाड टाकली. एका दालमिलमध्ये ९२० क्विंटल, एका व्यापाऱ्यांकडे दीड क्विंटल तूरडाळ आढळून आली. धाडसत्राची कुणकुण लागताच हजारो क्विंटल तूरडाळ साठेबाजांनी कुठे लपविली, हा चर्चेचा विषय बनला आहे. खासगीमध्ये ५ ते १० हजार क्विंटल तुरीच्या डाळीचा साठा असल्याचे बोलल्या जाते. मात्र यापलिकडे साठेबाजी सुरू असते. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.

साठवणूक आढळल्यास कारवाई
महसूल विभागाच्या धाडसत्रात ९ हजार ३१३ क्विंटल चना, १४ हजार ३५६ क्विंटल सोयाबीन,९२९.७ क्विंटल, तूर डाळ, २१ हजार ५१० लिटर खाद्यतेल, ५ हजार ३९९ क्विंटल साखर, २ हजार १२३ क्ंिवटल एरंडी एवढा साठा आढळून आला. साठवणुकीकरिता परवानाधारक व्यापाऱ्यांना नगरपरिषद हद्दीत तेल ३०० क्विंटल, डाळी एक हजार ५०० क्ंिवटल, तसेच खाद्य तेलबिया ८०० क्विंटलपर्यंत साठवून ठेवता येते. याव्यतिरिक्त अतिरिक्त साठवणूक आढळली तर कायदेशीर कारवाई करण्याचे प्रावधान आहे.

शासनाच्या निकषाप्रमाणे धान्याची साठेबाजी करणाऱ्यांची तपासणी सुरू आहे. मर्यादेपेक्षा जास्त साठा आढळल्यास त्यांचा लिलाव केला जाईल.
- पुरुषोत्तम भुसारी,
तहसीलदार, वरुड.

Web Title: Thousands of khantal dal lumpas have been done by the stock market before the yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.