हजारो गजानन भक्तांनी घेतले पादुकांचे दर्शन
By Admin | Updated: February 2, 2016 00:04 IST2016-02-02T00:04:13+5:302016-02-02T00:04:13+5:30
स्वामी समर्थ, गजानन महाराज व साईबाबांच्या पादुका बडनेरा शहरात दोन दिवस विविध ठिकाणी मुक्कामी होत्या.

हजारो गजानन भक्तांनी घेतले पादुकांचे दर्शन
दोन दिवस पर्वणी : शोभायात्रेने दुमदुमली बडनेरनगरी
बडनेरा: स्वामी समर्थ, गजानन महाराज व साईबाबांच्या पादुका बडनेरा शहरात दोन दिवस विविध ठिकाणी मुक्कामी होत्या. पादुकांच्या दर्र्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे शहराचे वातावरण भक्तीमय झाले होते. पादुकांची भव्य शोभायात्रा देखील काढण्यात आली.
३१ व १ जानेवारीला दोन दिवस स्वामी समर्थ, गजानन महाराज व साईबाबांच्या पादुका बडनेरात मुक्कामी होत्या. दत्तमंदिर झिरी येथे पादुका पोहोचल्यावर तेथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पुढे त्या नव्यावस्तीतील नरेंद्र देवरणकर यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आला. सायंकाळी येथे महाआरती करण्यात आली. यावेळीा मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी या पादुका जुन्यावस्तीतील विनोद मिसाळ, विनोद आमले व माळीपुुऱ्यातील गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट येथे भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्यात. होत्या. मार्गात ठिकठिकाणी भाविकांनी या त्रिवेणी पादुकांचे स्वागत केले. मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.पादुकांच्या मुक्कामाच्या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मागिल वर्षी केवळ गजानन महाराजांच्या पादुका बडनेऱ्यात आल्या होत्या. यावर्षी तीन संतांच्या पादुकांच्या दर्शनाचा तिहेरी लाभ बडनेरावासियांना घेता आला. स्वामी समर्थ, गजानन महाराज व साईबाबांच्या सहवासात असणाऱ्या भाविकांनी या पादुका दिल्या असल्याची माहिती आहे.