शोभायात्रेतून झळकले गाडगेबाबांचे विचार
By Admin | Updated: February 26, 2015 00:16 IST2015-02-26T00:16:29+5:302015-02-26T00:16:29+5:30
संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्ताने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

शोभायात्रेतून झळकले गाडगेबाबांचे विचार
अमरावती : संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्ताने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक नेहरु मैदान येथून निघालेल्या शोभायात्रेचे उद्घाटन प्र-कुलगुरु जयकिरण तिडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व्ही.एम. मेटकर, एस.डी. कतोरे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते, प्र.वित्त व लेखा अधिकारी संतोष सदार, संत गाडगे बाबा अध्यासन प्रमुख एम.टी. देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक अरविंद देशमुख, संचालक, श्रीकांत पाटील, संजय देशमुख, जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर, संचालक, शारीरिक शिक्षण व रंजन मंडळाचे संचालक, अविनाश असनारे, शिंगवेकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. संत गाडगेबाबांनी आपल्या हयातीत प्रवास केलेल्या वाहनाने शोभायात्रेचा प्रारंभ झाला. शोभायात्रेत विद्यापीठाशी संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, डी.सी.पी.ई., बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय, विद्यापीठाचा केमिकल टेक्नॉलॉजी विभाग, विद्याभारती महाविद्यालय, आय.बी.बी.एस. अभियांत्रिकी महाविद्यालय व श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, भारतीय महाविद्यालय, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयांसह इतर महाविद्यालयांतील रासेयोचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
गाडगेबाबांच्या वेशात हातात झाडू घेऊन गाडगेबाबांचा दशसुत्री संदेश यासह विद्यार्थ्यांनी गाडगेबाबांचे विचार शोभायात्रेच्या माध्यमातून सांगितले. विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीच्या रासेयोच्या विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबांच्या संदेशावर पथनाट्य सादर केले.
शहराच्या विविध मार्गावरुन मार्गक्रमण करुन शोभायात्रा गाडगेनगरस्थित संत गाडगे महाराज समाधी मंदिरावर पोहोचली त्याठिकाणी गाडगेबाबांच्या विचारांचा जयघोष करण्यात आला व शोभायात्रेची सांगता झाली. शोभायात्रेचे संचालन राजेश पिदडी यांनी केले.
यावेळी शोभायात्रेत सहभागी झालेल्या महाविद्यालयांच्या रासेयो पथकाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये भारतीय महाविद्यालय, अमरावती, डी.सी.पी.ई., अमरावती, आय.बी.बी.एस. अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती. इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आलीत. (प्रतिनिधी)