‘त्या‘ तीन आरोपींची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:13 IST2021-03-15T04:13:47+5:302021-03-15T04:13:47+5:30
चांदूर रेल्वे : स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत चांदूरवाडी येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील अटक तीनही आरोपींना रविवारी चांदूर रेल्वे न्यायालयाने न्यायालयीन ...

‘त्या‘ तीन आरोपींची कारागृहात रवानगी
चांदूर रेल्वे : स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत चांदूरवाडी येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील अटक तीनही आरोपींना रविवारी चांदूर रेल्वे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
९ मार्च रोजी फिर्यादी राजूसिंग सरदारसिंग चितोडिया (रा. चांदूरवाडी) यांच्या घरून दागिने लंपास केल्याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३८०, ४५४, ४५७ अन्वये गुन्हा दाखल करून तपास केला. हा तपास चांदूर रेल्वेचे ठाणेदार मगन मेहते व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात संयुक्तरीत्या करण्यात आला. यात आरोपी उमेश उत्तमराव गलबले, मोहन बबनराव नागोसे व विजय शामराव भोयर यांना अटक करून २ लाख १६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला होता. चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपींना शनिवारी चांदूर रेल्वे येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही १४ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यानंतर रविवारी पुन्हा चांदूर रेल्वे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावून अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश मुपडे करीत आहे.