‘त्या’ चौघींनी दाखविला भूतदयेचा आदर्श

By Admin | Updated: February 12, 2016 00:50 IST2016-02-12T00:50:14+5:302016-02-12T00:50:14+5:30

सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस माणसाला ओळखेनासा झाला आहे. मग, मुक्या जिवांची कणव येणार कुणाला?

'Those' Choughee have shown the ideal of 'ghost' | ‘त्या’ चौघींनी दाखविला भूतदयेचा आदर्श

‘त्या’ चौघींनी दाखविला भूतदयेचा आदर्श

संदीप मानकर अमरावती
सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस माणसाला ओळखेनासा झाला आहे. मग, मुक्या जिवांची कणव येणार कुणाला? परंतु स्कॉर्पिओ चालकाच्या निर्दयतेने गंभीर जखमी झालेल्या इवल्याशा श्वानाच्या पिलाला चार महिलांनी उचलून जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालयात दाखल केले आणि भूतदयेचा आदर्श दिला. या पिलावर पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त एस. एस. गोरे यांचे उपचार सुरू आहेत.

स्कार्पियो चालक फरार
अमरावती : शहरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयालगत रिकाम्या भूखंडावर दुपारी १२ वाजताच्या दरम्यान स्कार्पिओ वाहनाने श्वानाच्या चिमुकल्या पिलाला धडक दिली. त्याच्या मानेला आणि डोक्याला गंभीर इजा झाली. नाकातून व तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला. हे श्वान प्राणांतिक वेदनांनी तडफडत असताना या चार महिलांना त्याची कणव झाली. सामाजिक कार्यकर्त्या व प्राणीप्रेमी विद्या देशमुख (अंभोरे), शीतल काळे, वैशाली परतेती, विशाखा आठवले यांनी त्या पिलाला आॅटोरिक्षाने जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात नेले. तेथे डॉक्टर उपस्थित नव्हते. परिणामी अर्ध्या तासाने डॉक्टर आल्यानंतर उपचार सुरू झालेत. पशुधन विकास अधिकारी एस. ए. मुत्तेमवार यांनीही सदर श्वानावर उपचार केले. सहा वाजताच्या दरम्यान हे पिलू विद्या देशमुख यांच्या स्वाधीन करण्यात आले.

एम.एच.२७ एए६६६ क्रमांकाच्या स्कार्पिओने पिलाला जखमी केले. पिलू झोपले असताना चालकाला माहिती असतानाही त्याने मुद्दाम हे कृत्य केले. चालकाचा शोध घेऊ. पोलीस तक्रार देऊ.
- विद्या देशमुख,
कॅम्प,अमरावती.

Web Title: 'Those' Choughee have shown the ideal of 'ghost'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.