अचलपूर पंचायत समितीत अन् पीएचसीत ३० जण लेटलतीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:58+5:30
धामणगाव गढी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, कनिष्ठ सहायक, एलएमव्ही, कंत्राटी वाहनचालक, इंटर्नशिप वैद्यकीय अधिकारी, परिचर व सफाई कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. काही कर्मचारी कार्यालयीन गणवेशात नव्हते. कुणाकडे ओळखपत्र नसल्याचेही अध्यक्षांना आढळून आले.

अचलपूर पंचायत समितीत अन् पीएचसीत ३० जण लेटलतीफ
अमरावती : जिल्हा परिषद अध्यक्षांनी कार्यालयात उशिरा येणाºया व दांडी मारण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी मागील काही दिवसांपासून आकस्मिक भेटीची मोहीम सुरू केली आहे. ३० जानेवारी रोजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सकाळी ८.१० मिनिटांनी धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट दिली. यावेळी १३ कर्मचारी गैरहजर आढळले. अचलपूर पंचायत समितीला सकाळी १०.१० वाजता भेट दिली असता, १६ कर्मचारी गैरहजर आढळले.
धामणगाव गढी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, कनिष्ठ सहायक, एलएमव्ही, कंत्राटी वाहनचालक, इंटर्नशिप वैद्यकीय अधिकारी, परिचर व सफाई कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. काही कर्मचारी कार्यालयीन गणवेशात नव्हते. कुणाकडे ओळखपत्र नसल्याचेही अध्यक्षांना आढळून आले. काही कर्मचारी हजर होते; मात्र त्यांची हजेरी रजिस्टरवर नोंद नसल्याचे दिसून आले. दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांची वेतन कपात, सेवा पुस्तिकेत नोंद व मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांना देशमुख यांनी दिले.
अचलपूर पंचायत समितीतही १६ कर्मचारी गैरहजर
स्थापत्य अभियंता सहायक, कनिष्ठ सहायक अनुपस्थित होते. कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी (कृषी) हजर होते. मात्र, हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी नव्हती. कनिष्ठ सहायक, हातपंप वाहनचालक, वाहक, सीडीसीओ मग्रारोहयो, बीएम, आॅपरेटर, सीसी, एसबीएम आदी कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. या सर्वांचे वेतन कपात करण्यात यावे, हजेरी रजिस्टर, दौरा पंजी व हलचली पंजी रजिस्टर अद्ययावत ठेवावे, कर्मचाऱ्यांनी नियमित ओळखपत्र लावावे, चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना कार्यालयीन गणवेश नियमित परिधान करण्याची ताकीद देण्याचे निर्देश बीडीओ जयंत बाबरे यांना अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिले.