रिद्धपूर येथे तेरावे अ.भा. महानुभाव साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:13 IST2021-09-19T04:13:19+5:302021-09-19T04:13:19+5:30
स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. अनिल बोडे यांची निवड चांदूर बाजार (अमरावती) : ३१ डिसेंबर २०२१ आणि १ व २ जानेवारी ...

रिद्धपूर येथे तेरावे अ.भा. महानुभाव साहित्य संमेलन
स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. अनिल बोडे यांची निवड
चांदूर बाजार (अमरावती) : ३१ डिसेंबर २०२१ आणि १ व २ जानेवारी २०२२ रोजी मोर्शी तालुक्यातील महानुभावांची काशी असलेल्या रिद्धपूर येथे यावर्षीचे तेरावे अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलन होऊ घातले आहे.
आजपर्यंत देशात निरनिराळ्या ठिकाणी अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलने झालीत. यंदाच्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे राहतील, अशी माहिती आयोजन समितीचे सदस्य नरेशचंद्र काठोळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.
ज्येष्ठ लेखक पुरुषोत्तम नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती येथे झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. सभेला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त अध्यापक शरद पुसदकर, मिलिंद कहाळे, मनोहर गुल्हाने, डॉ. मंगेश देशमुख व प्रमोद नागपुरे उपस्थित होते.
वर्धा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांनीदेखील संमेलनासाठी सहभाग नोंदविला आहे. या संमेलनात भारतातील ज्येष्ठ महानुभाव तसेच महानुभावपंथाचे अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सर्वच विद्यापीठातील, महाविद्यालयातील प्रत्येकी दोन विद्यार्थी व एक प्राध्यापक यांना संमेलनाला निमंत्रित करण्यात येणार आहे.