शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शस्त्राच्या धाकावर लुटले तब्बल साडेतेरा लाख; यवतमाळ मार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 14:30 IST

धानोरानजीक विनाक्रमांकाच्या वाहनाने ओव्हरटेक, किराणा मालाच्या वसुलीची होती रक्कम

नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : यवतमाळ येथून किराणा मालाच्या वसुलीची रक्कम घेऊन येणारे चारचाकी वाहन अडवून त्यातील तब्बल साडेतेरा लाखांची रोकड लुटण्यात आली. चालकाला शस्त्राचा धाक दाखवत अज्ञात लुटारूंनी धानोरानजीक रविवारी रात्री साडेदहानंतर ही वाटमारी केली. 

पोलिस सूत्रांनुसार, बडनेरा येथील लकडगंजमधील इम्रान बेग गफ्फार बेग (३८) हा मालवाहू चारचाकीने अमरावतीकडे येत होता. रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या कारने नांदगाव खंडेश्वर ते धानोरा गुरव मार्गाने त्याच्या वाहनाचा पाठलाग केला आणि गाठल्यानंतर कार आडवी लावली. त्यामधून उतरलेल्या चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी तलवार व चाकूचा धाक दाखवत डिक्कीत ठेवलेली ही रक्कम चालकाकडून हिसकावून घेतली.

अमरावतीच्या व्यावसायिकाची रक्कम

अमरावती येथील ड्रायफ्रूट व्यावसायिकाच्या किराणा मालाची ही रक्कम असल्याची माहिती पुढे येत आहे. याप्रकरणी चालक इम्रान बेग याच्या तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी पहाटे ४ च्या सुमारास गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक विशाल पोळकर पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीAmravatiअमरावतीRobberyचोरी