अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात ४६. ७१ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 14:55 IST2020-12-01T14:54:53+5:302020-12-01T14:55:15+5:30
Amravati News election विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात दुपारी २ पर्यंत ४६.७१ टक्के मतदान झाले. एकूण ३५ हजार ६२२ पैकी १६ हजार ६४० मतदारांनी हक्क बजावला.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात ४६. ७१ टक्के मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात दुपारी २ पर्यंत ४६.७१ टक्के मतदान झाले. एकूण ३५ हजार ६२२ पैकी १६ हजार ६४० मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये १२ हजार ३५२ पुरुष व ४२८८ महिला मतदार आहेत. ग्रामीण भागातील ३० वर अधिक मतदान केंद्रात दुपारनंतर मतदारांनी गर्दी केली आहे. निवडणूक विभागाने प्रत्येक मतदान केंद्रावर आठ ते दहा पीपीई कीट ठेवल्या असल्या तरी अद्याप याचा वापर झाला नसल्याचे सांगितले. याशिवाय कोरोनाग्रस्त मतदारांना व दिव्यांग मतदाराला पोस्टल बॅलेटची सुविधा देण्यात आलेली आहे. मुदतीत फक्त २७ दिव्यांग मतदारांनी या सुविधेचा लाभ घेतला. एकाही संक्रमित मतदाराने ही सुविधा घेतलेली नाही. दुपारपर्यंत अमरावती जिल्ह्यात ४६.२५ टक्के, अकोला ४६.२४, वाशिम ४७.२६, बुलडाणा ४५.०२ व यवतमाळ जिल्ह्यात ४९.२० टक्के मतदान झाले आहे.