तिसरी मुलगी झाल्याने अर्भक पुरले जमिनीत
By Admin | Updated: July 30, 2016 23:57 IST2016-07-30T23:57:11+5:302016-07-30T23:57:11+5:30
वलगाव ठाण्याच्या हद्दीतील रामा गावात १० जुलै रोजी स्त्री अर्भक जमिनीत पुरल्याची घटना उघडकीस आली.

तिसरी मुलगी झाल्याने अर्भक पुरले जमिनीत
रामा येथील घटना : आई-वडिलांची निर्दयता
अमरावती : वलगाव ठाण्याच्या हद्दीतील रामा गावात १० जुलै रोजी स्त्री अर्भक जमिनीत पुरल्याची घटना उघडकीस आली. त्यामध्ये निर्दयी आई-वडिलांनी तिसरीही मुलगी झाल्यामुळे गर्भपात केला आणि स्त्री अर्भक जमिनीत पुरल्याची धक्कादायक माहिती हाती लागली. अद्यापपर्यंत पोलिसांनी आरोपीला अटक केली नसून दोन दिवसांत आरोपी अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
शासनातर्फे मुलींची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मुलींची हत्या थांबविण्याचे जनजागृती केली जात आहे. मात्र, आजही काही निर्दयी आई-वडिल आपल्या जन्मजात मुलींची हत्या करीत आहे. अशीच घटना १० जुलै रोजी रामा गावात उघडकीस आली. तेथील रहिवासी सुधाकर पंजाब जुनघरे यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेत काही श्वान स्त्री अर्भकाचे लचके तोडत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानुसार नागरिकांनी पोलीस पाटील नितीन बबन तेलखेडे यांना माहिती दिली होती. त्यांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता ८ ते ९ महिन्याचे स्त्रि अर्भक हे अर्धा फूट जमीन खोदून पुरण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सदर स्त्री अर्भक रामा गावातील असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. तिसरी मुलगी झाली म्हणून गर्भपात करून ते अर्भक जमिनीत पुरण्यात आले. याप्रकरणात पुढील कारवाई करण्यात येईल.
- एस. पी. सोनवणे,
पोलीस निरीक्षक, वलगाव ठाणे