विद्युत कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या
By Admin | Updated: November 10, 2014 22:36 IST2014-11-10T22:36:13+5:302014-11-10T22:36:13+5:30
सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांची ही समस्या सोडविण्यासाठी प्रहारचे पंचायत समिती सदस्य प्रदीप निमकाळे यांच्या

विद्युत कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या
अंजनगाव सुर्जी : सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांची ही समस्या सोडविण्यासाठी प्रहारचे पंचायत समिती सदस्य प्रदीप निमकाळे यांच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी अंजनगावच्या वीज वितरण कार्यालयात सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने तालुक्यातील शेकडो विद्युत रोहीत्र ओव्हरलोड झाले असून त्यातील अनेक रोहीत्र जळाल्याने नादुरुस्तही झाले आहेत. त्यामुळे सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रहारचे पंचायत समिती सदस्य प्रदीप निमकाळे यांच्या नेतृत्त्वात येथील वीज वितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यांच्या दालनात दोन तास ठिय्या आंदोलन केले. कृषी पंपाचा वीज पुरवठा नियमीत करण्याची मागणी रेटली. या आंदोलनात अरुण शेवाळे, राजेश ढोक, सचिन कोळे, सुनील बुंदिले, राहुल धुमाळे, गणेश रोंघे, शंकरराव ढोक, विनायक गायगोले, गोपाल धुमाळे, देवा आगलावे, नीलेश साखरे, संजय राऊत, गजानन निमकाळे, सुनील काशीकर, अश्निन देशमुख, अवि टांक आदींचा समावेश होता.